
महाराष्ट्र कोरोना वायरसचा उद्रेक. राज्यात माघील 24 तासात 17864 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद.

मुंबई,दि.17 मार्च:- महाराष्ट्र राज्यात कोरोना वायरस दिवसेंदिवस वेगाने पसरत आहे. कोरोनामुळे रोज हजारो रुग्णांची भर पडत चालली आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आज 9510 करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण 21,54,253 करोना वायरस बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.77% एवढे झाले आहे. मागील 24 तासात राज्यात 17,864 नवीन कोरोना बांधीत रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज 87 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोना वायरस मृत्यूदर 2.26% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,77,15,522 प्रयोगशाळा तपासणी नमुन्यांपैकी 23,47,328 कोरोना नमुने 13.25 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,52,531 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,067 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच राज्यात एकूण 1,38,813 कोरोना वायरस बांधीत ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अंशता लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर नागूरमध्ये आठवडा भराचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. नागपूरमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूरमध्ये आठवड्याभराच्या लॉकडाऊनसह काही निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु या लॉकडाऊनमध्ये काही अस्थापनांना मुभा देण्यात आली आहे. यामध्ये कारखाने, बांधकामे, वाहतूक व्यवस्था सुरु आहे. यामुळे लॉकडाऊन असूनही रस्त्यावर लोकांची गर्दी दिसत आहे. नागपूरात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही क्वारंटाईन करण्यात येत आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईसह राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. अशीच कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास लवकरच लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते असे भाकित आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वर्तवले होते.
मुंबईत मागील 24 तासात 1922 कोरोना वायरस बांधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 4 कोरोना वायरस बांधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण 1236 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 34,75,581 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 31,98,78 वर पोहोचली आहे. 15,263 रुग्णांवर कोरोनावरील उपचार सुरु आहे. आतापर्यंत फक्त मुंबईत 11,539 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.