The prostitution business was started under the name of Mumbai NGO.
The prostitution business was started under the name of Mumbai NGO.

मुंबई NGO सामाजिक संस्थेच्या नावाखाली सुरू होता देहविक्रीचा धंदा.

The prostitution business was started under the name of Mumbai NGO.

✒राज शिर्के प्रतिनीधी✒
वसई, 17 मार्च :- मुंबई जवळील वसईमधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसई पोलिसांनी एका NGO सामाजिक संस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या देह व्यापाराचा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकून 2 पीडित महिलांचा सुटका केली आहे तर एका महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात वसई पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे, एका सामाजिक संस्थेच्या आड हा गोरखधंदा सुरू होता.

वसईच्या कृष्णा टाऊनशीप या हायप्रोफाईल परिसरात आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि सापळा रचला.

पोलिसांनी मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एक बोगस ग्राहक पाठवला होता. त्यानंतर देहविक्रीची पुढे चर्चा झाली. या संस्थेत सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्ररजमा झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर एका आरोपी महिलेला अटक केली आहे. नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने गुप्त बातमीदारच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here