मुंबईतील बीएमसी कामगारांसाठी खुशखबर, कामगारांकरिता बांधली जाणार २९ हजार घरे

53

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना 12 हजार निवासस्थाने देण्यात येणार असून 35 वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी 11 गट तयार

मुंबईतील बीएमसी कामगारांसाठी खुशखबर, कामगारांकरिता बांधली जाणार २९ हजार घरे

मीडिया वार्ता न्युज
१७ मार्च, मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना 12 हजार निवासस्थाने देण्यात येणार असून 35 वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी 11 गट  तयार करण्यात आले आहे. याकरिता डिझाईन ॲण्ड बिल्ट टर्नकी बेसिसवर निविदा व फेरनिविदा मागविण्यात आल्या होत्या. तद्नंतर 6 नोव्हेंबर 2020 रोजी एक अंतिम प्रतिसाद प्राप्त झाला. या निविदेद्वारे 29 हजार कर्मचाऱ्यांना ही सर्व्हिस घरे द्यायची असून ही जागा दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने बांधकामास 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहेअशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सफाई कामगारांच्या 46 वसाहती असून त्यामधील 29 हजार 816 कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 5592 कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहे. सफाई कामगारांच्या वसाहती या सन 1960 दरम्यानच्या असून अनुचित प्रकार व जिवितहानी टाळण्यासाठी गट 2 व गट 3 मधील 12 वसाहतींचा पुनर्विकास कंत्राटदारांमार्फत करायचा असून या पुनर्विकासाबाबतची सर्व जबाबदारी ही कंत्राटदारावर सोपविण्यात आली असून देखभाल व दुरूस्तीचा कालावधीचा 10 वर्षांचा करण्यात आला आहे.

हे आपण वाचलंत का?

 

आर.सी.सी. कामाकरिता एम 40 एम.एम.ग्रेडचे कॉक्रीट वापरण्यात येणार असून संबंधित कंत्राटदाराने 24 महिन्यात काम केले नाही तर त्यांच्यावर दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. अत्यंत चांगले आणि दर्जात्मक काम होईल. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावरील घरे देण्यासंदर्भात शासन तसेच महापालिका विचार करेलअसेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/CbJpZfWK0Ms/