जिल्हा पोलीस अधीक्षक मा. वसंत जाधव यांनी पोलीसांचा केला सत्कार
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
भंडारा :- आपल्या महाराष्ट्रात विदर्भातील भंडारा जिल्हा हा प्रशिद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो. दिनांक १४ मार्च २०२२ रोज सोमवारला लाखांदुर पोलीसांनी घटनेच्या दिवसा पासुन अवघ्या दोन दिवसात तीन आरोपींना मुद्देमालासह अटक केली. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. वसंत जाधव सर यांनी लाखांदुर पोलीसांचा सन्मान केला, व त्यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथे करण्यात आला.
रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लाखांदुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंतरगाव व डोकेसरांडी येथुन दोन बोलोरो गाड्यांची चोरी केली होती. या घटनेत दोन भिन्न तक्रारीवरुण दोन्ही घटनेत आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आले होते. या गुन्हेची तपास कामे ठानेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासकार्य सुरु केले. अवघ्या दोन दिवसात गुन्हाचा छडा लावला. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, पवनीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधु यांनी लाखांदुरचे ठानेदार रमाकांत कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे, सुभाष शहारे हे यावेळी उपस्थीत होते.