श्रीवर्धन पोलीस दलातर्फे होळी, धुलिवंदन, शिवजयंती सणांच्या निमित्ताने काढण्यात आला रूट-मार्च

नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व्यवस्थेची यंत्रणा कार्यरत 

श्रीवर्धन पोलीस दलातर्फे होळी, धुलिवंदन, शिवजयंती सणांच्या निमित्ताने काढण्यात आला रूट-मार्च

रशाद करदमे
१७ मार्च,श्रीवर्धन: रंगांचा सण होळी आणि धुलिवंदनचा सण श्रीवर्धनमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असल्याने आणि लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने गेल्या दोन वर्षानंतर यावर्षी लोकांनी मोकळेपणाने सण साजरा करण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. तरीही अशावेळी कोणी नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व्यवस्थेची यंत्रणा चोख काम बजावत आहे.

या अंतर्गतच आज सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीत होळी, धुलिवंदन, शिवजयंती या सणाच्या अनुषंगाने पोलीस दलाकडून रूट मार्च काढण्यात आला. श्रीवर्धन पोलीस ठाण्यापासून सुरुवात झालेल्या रूट मार्चचा मार्ग -शिवाजी चौक – बाजारपेठ – कासिम राऊत चौक – पेशवे स्मारक – जोशी चौक – बस स्टँड असा होता.

रूट मार्चची सकाळी पाऊणे अकराला सुरुवात होऊन तो दुपारी सव्वा बारा वाजता संपवण्यात आला. जवळपास दीड तास चाललेल्या या मार्चमध्ये २ वरिष्ठ पोलीस अधिकारी, १० अंमलदार आणि एक एसआरपीफच्या प्लाटूनने सहभाग घेतला होता. तालुक्यात आज होळी साजरा जात असून उद्या धूलिवंदनचा साजरा करण्याची जय्यत तयारी नागरिकांकडून सुरु आहे. या दरम्यान प्रशासनाने जाहीर केलेले नियम पाळण्याचे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आलेले आहे. 

हे आपण वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here