उत्तर भारतात साजरी होणारी होळी हि दक्षिण भारत साजऱ्या होणाऱ्या होळीपेक्षा वेगळी असते. इतकेच देशातील गाव – खेड्यांमध्येही होळी सणानिम्मित वेगवेगळ्या रीती-परंपरांचे पालन केले जाते.

मनोज कांबळे: भारतात दर दहा कोसांवर भाषा बदलते, राहण्या-बोलण्याचा लहेजा बदलतो असे म्हटले जाते. इतकी विविधता भारतीय संस्कृती आणि इथल्या लोकांच्या जीवनमानात भरलेली आहे. हि विविधता होळीसारख्या देशभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये देखील दिसून येते. उत्तर भारतात साजरी होणारी होळी हि दक्षिण भारत साजऱ्या होणाऱ्या होळीपेक्षा वेगळी असते. इतकेच देशातील गाव – खेड्यांमध्येही होळी सणानिम्मित वेगवेगळ्या रीती-परंपरांचे पालन केले जाते. कशा असतात होळी साजरी करण्याच्या मनोरंजक पद्धती. चला पाहू.
लठमार होळी: मथुरेहून २७ किलोमीटरवर असलेल्या बरसाना येथे लठमार होळी साजरी करण्यात येते. या दरम्यान होळी फक्त रंगानेच नव्हे तर लाठ्यांनी देखील साजरी केली जाते. लठमार होळीमध्ये स्त्रिया पुरुषांना काठीने मारण्याचा प्रयत्न करतात तर पुरुष स्वतःला वाचवणाचा प्रयत्न करतात.
होला मोहल्ला: होला मोहल्ला हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी जगभरातील शीख समुदायाकडून साजरा केला जातो. असे म्हटले जाते कि, शिखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांनी या सणाची सुरुवात मार्शल आर्ट मध्ये लोक पारंगत होऊन स्वतःचे संरक्षण करण्यालायक होतील, यासाठी सुरु केली होती. या दिवशी शीख समुदायातील लोक कुस्ती, मैदानी साहसी खेळ, घोड्यांच्या शर्यती यांसारख्या उपक्रमात भाग घेतात. तसेच या दरम्यान शीख धर्मग्रंथातील कवितांचे देखील वाचन केले जाते.
योसंग सण: मणिपूर राज्यात हा सण पाच दिवस साजरा करण्यात येतो. या दरम्यान मणिपुरी देवता “पाखंगबा” यांची पूजा केली जाते. सूर्यास्त झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये एक सणानिमित बांधलेली कच्ची झोपडी जाळली जाते. त्यानंतर लहान मुले आणि मुली पारंपरिक पोशाख घालून शेजारच्या घरांमध्ये देणगी मागण्यासाठी फेऱ्या मारतात. सणाच्या शेवटच्या दिवशी रंगाची उधळून करून होळी साजरी केली जाते.
शिमगा: कोकणामध्ये सर्वात लोकप्रिय असणारा हा सण फार वैशिष्ट्य पद्धतीने साजरा केला जातो. या दरम्यान कामानिमित्त शहरामध्ये राहणारे लोक कोकणातील आपल्या गावी परततात. गावातल्या कुलदैवतेला पालखीमध्ये बसवून गावभर मिरवणूक काढली जाते. यादरम्यान गावातील होशी कलाकारांकडून नमन हा विनोदी नाटकप्रकार सादर केला जातो. तसेच होलिका दहनाच्या दिवशी झाडाच्या खोडाची पूजा केली जाते. त्या खोडाला आपल्या हातांनी झेलत लोक विविध प्रकराची नृत्य सादर करतात आणि शेवटी मोठं मोठ्याने आरोळ्या देत त्या खोडाचे आगीत दहन केले जाते.काही गावातून तर जळत्या निखाऱ्यांवरून चालण्याच्या प्रथेचे पालन केले जाते.
सौंथना विंचू होळी: उत्तर प्रदेशमधील सौंथना गावातील होळीची परंपरा फारच विलक्षण आहे. या दिवशी गावातील लोक मोठमोठ्याने ढोल वाजवून विचंवाना बिळातून बाहेर पडण्यास प्रेरित करतात. भर पडलेल्या विचंवाना पकडून आपल्या अंगांवर ठेवतात. या दिवशी विंचू लोकांना चावत नाही, असे इथल्या गावांमध्ये मानले जाते.
वाराणसी: वाराणसीमधील होळीची एक प्रथा अंगावर शहरे आणणारी आहे. या दिवशी लोक स्मशान भूमीतील राख जमा करून ती रंगांमध्ये मिसळतात. या रंगांपासून मग होळी साजरी केली जाते. मृत्यू विषयी मनात असलेले भय संपवण्यासाठी अशी होळी साजरी करण्याच्या प्रथेला सुरुवात झाली, असे इथल्या लोकांचे मानाने आहे.