निर्भय बनो या सभेला नागरिकाची तुफान गर्दी

निर्भय बनो या सभेला नागरिकाची तुफान गर्दी

निर्भय बनो या सभेला
नागरिकाची तुफान गर्दी

निर्भय बनो या सभेला नागरिकाची तुफान गर्दी

मनोज गोरे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर मो.9923358970

कोरपना :- चंद्रपूर जिल्ह्यात तीन आठवड्यात दोन सभा कशाला म्हणून आम्ही चंद्रपूरच्या सभेला नको म्हणालो होतो पण बंडू धोत्रे नावाचा कार्यकर्ता पेटून उठला होता. कार्यकर्ता कसा असावा याचं उदाहरण म्हणजे बंडू धोत्रे. त्यांनी लोकांची मिटींग चालू असतांना काॅल केले आणि सांगितलं की भाऊ सभा करायचीच आहे आपल्याला. तो पाठपुरावा पाहून सभा घेण्याचा निर्णय झाला. उमाकांत धांडे यांच्यासह मंडळी तुटून पडली.

दोनशे कार्यकर्त्यांचा समूह तयार झाला. प्राथमिक बैठक झाली. दोन-तीनच्या एका एका गटानं चंद्रपूरमधला ग्रामीण भाग देखील पिंजून काढला. माणसं आपोआप यायला लागली. दोनशे रिक्षावाल्या भावांनी स्वतःच्या खर्चानं रिक्षांवर बॅनर लावले. शंभर रुपये देणारे तर असंख्य भाऊबहिणी आहेत. बघता बघता चंद्रपूरच्या ग्रुपवर लोकनिधी साचत गेला आणि सामान्य माणसांच्या प्रचंड उपस्थितीत कालची ही धुव्वाधार सभा पार पडली!

खुर्च्या संपल्या, माणसं मागे उभी राहिली. ती ही जागा संपली मग माणसं कंपाऊंड वाॅलच्या बाहेरच्या रोडवर उभी राहिली. तरुण-तरूणींची संख्या लक्षणीय होती.