कायदेविषयक शिबीरात कुष्ठरोगाबाबत जनजागृती

कायदेविषयक शिबीरात कुष्ठरोगाबाबत जनजागृती

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक ✍🏻
मो 9860020016

अमरावती :- वायगाव, ता. भातकुली येथील कायदेविषयक जनजागृती शिबिरात कुष्ठरोगाबद्दल जनजागृती करण्यात आली. सन 2027 पर्यंत जिल्हास्तरावर कुष्ठरोग प्रसार निर्मुलनाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले. यात सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयामार्फत कुष्ठरोग आजार आणि त्यासंबंधित कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. आरोग्यसेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार यांची चमू आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी ताहेर, फैज उल्ला, स्वप्निल खंडार, अनुश्री जिचकार, क्षितिजा चिमोटे, गौरी राठी, रायना खान यांनी कुष्ठरोग आजार कायद्याबाबत पथनाट्य सादर केले.
कुष्ठरोग संशयित लक्षणे असणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकांनी शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन स्वतःची कुष्ठरोगाचे निदान करणे गरजेचे आहे. लवकर निदान आणि लवकर उपचार महत्त्वाचे आहे. तसेच कुष्ठरोगामुळे होणारी विकृती सुद्धा टाळण्यासंबंधी माहिती देण्यात आली. बहुविध औषधोपचार कुष्ठरोगावर असणारा खात्रीशीर इलाज सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध असल्याची माहिती डॉ. मोहोकार यांनी दिली.
कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. नंदकिशोर रामटेके, प्रा. डॉ. किर्तीराज सावळे, वायगाव आयुष्मान आरोग्यवर्धिनी मंदिर येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद उल्हे, कुष्ठरोग तंत्रज्ञ रितेश बथेरिया यांनी पुढाकार घेतला.