ऑनलाईन क्रिकेट बेटिंगवर स्थानिक गुन्हे शाखेची जबर कारवाई
ऑनलाईन जुगार आय. डी. सह 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घूस : पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार सुगंधित तंबाकू,जुगार यांच्यावर कारवाई संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे चंद्रपूर येथील पथकाद्वारे घुग्घूस शहरात गस्त करीत असतांना मुखबीरने दिलेल्या सूचनेनुसार शहरातील मातारदेवी रोड चिंतामणी कॉलेज परिसरात राहणारा निवासी अंशुल रामबाबू रॉय वय 26 वर्ष हा आपल्या राहत्या घरी मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन लीग या क्रिकेट मॅचवर सट्टा (क्रिकेट बेटिंग ) घेत असल्याच्या संशयातून घरावर धाड टाकण्यात आली असता अँपल कंपनीचा आयफोन अंदाजे किंमत 1,00,000 ( एक लाख ) अंग झडतीत 3,00,000 (तीन लाख रुपये ) व 38 लाख रुपयांची जुगार आय. डी असा एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरोधात घुग्घूस पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिक्षक सुदर्शन मुमक्का,अप्पर पोलीस अधिक्षक रीना जनबंधू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नी.अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पो. उ. नी विनोद भुरसे,पो. उ. नी.मधुकर सामलवार,सुनील गौरकार पोहवा सतीश आवथरे, रजनीकांत पुठ्ठावार दिपक डोंगरे पोशी प्रशांत नागोसे,किशोर वाकाटे,शशांक बदामवार,अमोल सावे मिलिंद टेकाम यांच्यातर्फे करण्यात आली
*एल. सि. बी जोमात घुग्घूस पोलीस कोमात*
शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईने शहर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत.
शहरातील जुगार अड्डयावर घुग्घूस पोलिसांच्या नाकाखाली चंद्रपूर पोलीस कारवाई करतात मात्र शहर पोलिसांना शहरातील अवैधधंद्याची भनक लागत नाही ही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
गेल्या आठवड्यात शहरात काँग्रेस अध्यक्षाच्या घरातील बाल्कनी मध्ये एका मोठ्या बंदुकीची गोळी मिळून आली होती याप्रकरणाचा ही अजून उलघडा झालेला नाही