फूटपाथवर असलेल्या झाडांना जीवनदान देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वाचे पाऊल

फूटपाथवर असलेल्या झाडांना जीवनदान देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वाचे पाऊल

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे नागपूर शहरातील रस्त्यांच्या कडेला तसेच फूटपाथवर असलेल्या झाडांना जीवनदान देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरातील रस्त्यालगतची व फुटपाथवरील सिमेंट काँक्रीटच्या विळख्यात असलेली झाडे मोकळी करण्यासाठी मनपा विशेष अभियान राबविणार आहे. मनपाच्या या अभियानामुळे शहरातील सुमारे ३१०० झाडे मोकळा श्वास घेणार आहेत.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी (ता.१७) मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, डॉ. रंजना लाडे, श्री. विजय देशमुख, श्री. मिलिंद मेश्राम, श्री. प्रकाश वराडे, श्री. विनोद जाधव, श्री. गणेश राठोड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार व उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार उपस्थित होते. तसेच दहाही झोनचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.