यवतमाळ जिल्हात कोरोनामुळे काल 26 मृत्यु, 1237 नविन कोरोना पॉझेटिव्ह.
यवतमाळ जिल्हात कोरोनामुळे काल 26 मृत्यु, 1237 नविन कोरोना पॉझेटिव्ह.

यवतमाळ जिल्हात कोरोनामुळे काल 26 मृत्यु, 1237 नविन कोरोना पॉझेटिव्ह.

यवतमाळ जिल्हात कोरोनामुळे काल 26 मृत्यु, 1237 नविन कोरोना पॉझेटिव्ह.
यवतमाळ जिल्हात कोरोनामुळे काल 26 मृत्यु, 1237 नविन कोरोना पॉझेटिव्ह.

✒साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ,दि.17 एप्रिल:- यवतमाळ जिल्हात मोठ्या प्रमाणावर कोरोना वायरसने थैमान घातले आहे. हररोज शेकोडोच्या वर रुग्ण समोर येत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेने मोठा तान पडत असल्याचे समोर येत आहे. यवतमाळ जिल्हात माघिल 24 तासात 26 कोरोना वायरस बांधीत रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर 1237 नविन कोरोना वायरस बांधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. तर विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 660 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या मृतांमध्ये यवतमाळ येथील 36, 55, 47, 82, 51, 69 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला, मारेगाव तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 47 वर्षीय महिला व 61 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 80 वर्षीय पुरुष व दिग्रस तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 68 वर्षीय पुरुष, कळंब येथील 75 वर्षीय महिला, वणी येथील 75 वर्षीय महिला, नेर तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, नागपूर येथील 70 वर्षीय महिला, वरोरा येथील 65 वर्षीय पुरुष, धामणगाव येथील 55 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि.वाशिम) तालुक्यातील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत्यु झालेल्यांमध्ये पुसद येथील 45 व 65 वर्षीय महिला, यवतमाळ येथील 59 वर्षीय महिला आणि देवळी (जि.वर्धा) तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष आहे.

शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1237 जणांमध्ये 727 पुरुष आणि 510 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 431 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 107, पांढरकवडा 105, उमरखेड 98, कळंब 90, वणी 77, दिग्रस 69, मारेगाव 45, घाटंजी 41, आर्णि 31, बाभुळगाव 30, नेर 30, महागाव 22, झरीजामणी 20, दारव्हा 18, राळेगाव 9 आणि इतर शहरातील 14 रुग्ण आहे. शुक्रवारी एकूण 4929 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1237 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3692 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4987 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2430 तर गृह विलगीकरणात 2557 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 38524 झाली आहे. 24 तासात 660 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 32694 आहे. तर जिल्ह्यात एकूण 843 मृत्युची नोंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here