नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी.

152 शिफारसीं पैकी 25 उमेदवारांना नोकरी, तर उर्वरीत उमेदवारांना नियुक्ती करण्याबाबतची कार्यवाही सुरु.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी.

मनोज खोब्रागडे✒
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.17:- गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस एक विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी पात्रतेनुसार वर्ग-3 व वर्ग -4 च्या पदावर अटींच्या अधिन राहून शासन सेवेत थेट नियुक्ती द्यावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच नक्षलवाद्यांकडून मारल्या गेलेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटूंबापैकी पात्र असणाऱ्या एका व्यक्तीसाठी पोलीस अधिक्षक हे प्रमाणपत्र देण्यास सक्षम आहेत.

पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांचेकडून जिल्हाधिकारी कार्यालयास एकूण 180 प्रस्ताव प्राप्त झालेले असून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ज्येष्ठता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांचे ज्येष्ठतेनुसार व शैक्षणिक तसेच आवश्यक पात्रतेनुसार जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध कार्यालयाकडून रिक्त असलेल्या पदांची तातडीने माहिती घेवून त्यातील रिक्त पदावर नियुक्ती करण्याकरीता सन 2018 पासून ते आजतागायत पर्यंत वर्ग-3 करीता म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक यांचेकडे 38 उमेदवार, मुख्यवनसंरक्षक गडचिरोली यांचेकडे 8 उमेदवार, जिल्हा अधिक्षक गडचिरोली यांचेकडे 4 उमेदवार, पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांचेकडे 89 उमेदवार, परिवहन महामंडळ गडचिरोली यांचेकडे 1 उमेदवार, जिल्हा हिवताप कार्यालय यांचेकडे 2 उमेदवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांचेकडे 4 उमेदवार, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली यांचेकडे 1 उमेदवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गडचिरोली यांचेकडे 2 उमेदवार, व महसूल विभागात 3 उमेदवार असे एकूण 152 उमेदवारांना शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळ. मर्या. नाशिक यांचेकडून 8, महसूल विभाग-3, वनविभाग 8, पुरवठा विभाग 4, कृषी विभाग 1, व जिल्हा हिवताप कार्यालय 1 असे एकूण 25 उमेदवारांना संबंधित विभागाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

उर्वरीत उमेदवारांना नियुक्ती करण्याबाबतची संबंधित कार्यालयाकडून कार्यवाही सुरु
आहे. सद्यास्थितीत जिल्हा प्रशासनाकडे शिफारस करिता शिल्लक असलेले उमेदवारांना नियुक्ती देण्याचे दृष्टीने विविध कार्यालयाकडून रिक्त पदाची माहिती घेण्यात येत असून नक्षलपीडित उमेदवारांना तातडीने लाभ देण्याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहेत असे जिल्हाधिकारी, गडचिरोली दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here