आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि नागपूरातील प्रसिद्ध डॉ. कृष्णा कांबळे यांचं करोनामुळे निधन.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि नागपूरातील प्रसिद्ध डॉ. कृष्णा कांबळे यांचं करोनामुळे निधन.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि नागपूरातील प्रसिद्ध डॉ. कृष्णा कांबळे यांचं करोनामुळे निधन.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि नागपूरातील प्रसिद्ध डॉ. कृष्णा कांबळे यांचं करोनामुळे निधन.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि नागपूरातील प्रसिद्ध डॉ. कृष्णा कांबळे यांचं करोनामुळे निधन.

✒प्रशांत जगताप, कार्यकारी संपादक✒
नागपुर,दि.17 एप्रिल:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मान केलेल्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते, प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट कँसर रोग तज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे नवनियुक्त सदस्य सचिव डॉ. कृष्णा कांबळे यांचं आज नागपुरातल्या शासकीय रुग्णालयात करोनामुळे निधन झालं. ते गेल्या 15 दिवसांपासून उपचार घेत होते आणि वेंटीलेटरवर होते. त्यांनी चरित्र साधने प्रकाशन समितीचा ऑनलाईन पदभारही स्वीकारला होता. त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात केली होती. पुस्तकांचं संकलन आणि इतर कामकाज करताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

लहान पना पासुन गरीबीचे चटके सहन केल्याने डॉक्टर कृष्णा कांबळे यांना गरीबांची जाणिव होती. एक खरा आंबेडकरवादी डॉक्टर ज्याने प्रतीमाह 10 लाख रुपयाची नौकरी न करता गोर गरीब समाजाची दिवस रात्र सेवा केली. त्याचा समाजसेवेच्या ध्येयामुळे त्यांना 26 नोव्हेंबर 2019 भारतीय संविधान दिवस आणि त्यांचा जन्मदिवसी डॉ. कृष्णा कांबळे यांचा नागरी सत्कार समिती द्वारा दिक्षाभुमी येथील ऑडिटोरीयम मध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता.

जन्म कधी झाला…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी ज्या दिवशी भारतीय संविधान देशाला समर्पित केल 26 नोव्हेंबर 1949 ला त्याचं दिवशी डॉ. कृष्णा कांबळे यांचा जन्म झाला.

डॉक्टर कसे बनले…
आईचा मृत्यु हा टि.बी क्षयरोगाने झाल्यामुळे त्यांना टि.बी या रोगाने इतर कुठलाही मुलगा आई वीना पोरका न झाला पाहीजे म्हणून त्यांनी टि.बी चे डॉक्टर होण्याची लहान पणा पासुन सप्न बघीतली होती. पण नियतीला काही वेगळच मान्य होते म्हणून ते नागपुरातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट कॅन्सर तज्ञ झाले.

आंबेडकरी चळवळीतील योगदान….
त्यांनी निवृत्तीनंतर मिळणारी सर्व पेन्शन गरीब लोकांच्या कल्याणासाठी खर्च केली. ते असे म्हणत होते, आंबेडकरी आणि बौद्ध समाजातील जितके लोकं सरकारी नोकरीवर असलेल्या सर्व लोकांनी निवृत्तीनंतर मीळणा-या पेन्शन वर समाजातील गरीब लोकांची भागेदारी आहे. डॉ. कृष्णा कांबळे यांना मिळणारी पेन्शन त्यांनी पुर्णत गरिब समाजाला दान केली.

रुग्ण सेवा… समाज सेवा….
अवघ्या आठ वर्षांचे एका मुलाला कॅन्सर ने घेरल होते. तो चिमूकला आणि त्याचे वडिल रुग्णालयात आले होते. चिमुकल्याच्या कार्डावर महात्मा फुले जनआरोग्याचा स्टॅम्प असूनही शुल्क भरल्याशिवाय चाचणी होणार नाही, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्या गरिब बापाला सांगितले. पैसे नसल्याने चाचणी होणार नसल्याने वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. हे एका गरिबांच्या डॉक्‍टरला बघवले नाही, त्या डॉक्‍टरचे डोळे डबडबले. निवृत्त झालेल्या त्या डॉक्‍टरने खिशातून साडेतीनशे रुपये त्या चिमुकल्याच्या वडिलांच्या हातावर ठेवले. व चाचणी झाली. आता पुढील औषधोपचार कसा? हा सवाल मात्र अनुत्तरित होता. तरी त्यांनी त्यांची साथ सोडली नाही. चिमुकल्या कॅन्सरग्रस्ताचे नावदेखील माहित नाही. मात्र आयुष्यभर कॅन्सरग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव डॉ. कृष्णा कांबळे असे आहे. डॉ. कृष्णा कांबळेंनी मेडिकलच्या कॅन्सर विभागात 35 वर्षे सेवा दिली. निवृत्तीनंतरही त्यांची सेवा कॅन्सरग्रस्तांना मिळत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here