कोरोना लसीकरण जनजागृती ही काळाची गरज: जि.प. सदस्य सलील देशमुख.
कोरोना लसीकरण जनजागृती ही काळाची गरज: जि.प. सदस्य सलील देशमुख.

कोरोना लसीकरण जनजागृती ही काळाची गरज: जि.प. सदस्य सलील देशमुख.

मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला सदीच्छा भेट, कोरोना संसर्गाच्या आढावा

कोरोना लसीकरण जनजागृती ही काळाची गरज: जि.प. सदस्य सलील देशमुख.
कोरोना लसीकरण जनजागृती ही काळाची गरज: जि.प. सदस्य सलील देशमुख.

युवराज मेश्राम नागपुर प्रतीनिधी

मोवाड, ता17:- नागपुर जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा दररोज फुगत आहे. जिवनावश्यक व आरोग्यविषयक बाबी वगळता राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. मोठी शहरे वगळता ग्रामीण भागात कोरोना संसर्गाच्या धाकाने नागरीक आपले कामधंदे सोडुन आपआपल्या घरात लाॅक आहेत. साधारण सर्दी, खोकला झाल तर घरीच आपला आयुर्वेदीक अथवा गावठी इलाज करून दुरूस्त होत असतांना दिसत आहेत. तरीही लसीकरणाचा वेग हा थांबता कामा नये, त्यासाठी जनजागृती करून नागरीकांना लसीकरण करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रवृत्त करण्यात यावे, कारण लसीकरण बाबतची जनजागृती ही आज काळाची गरज असल्याचे मत राष्र्टवादी काग्रेसपक्षाचे युवा नेते, जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी बोलुन दाखवीले.

ता. 16 ला सायंकाळी 6 वाजता मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना संसर्गाच्या आढावा भेटीदरम्यान ते मोवाडला आले होते. यावेळी मोवाड प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय सोळंकी, नरखेड प.स. सभापती निलिमा रेवतकर, तहसीलदार जाधव, नरेश अरसडे, अनिल साठोणे, ज्ञानेश्वर मुलताईकर, मोवाड न.प. चे प्रशासकीय अधिकारी प्रविण तपकीरे, तसेच नरखेड व मोवाड येथील पोलीस कर्मचारी प्रामुख्याने ऊपस्थीत होते.

सलील देशमुख यांनी प्राथमिक आरौग्य केंद्र मोवाड येथे भेट देउन कोरोना परीस्थीतीचा आढावा व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कसा आटोक्यात आणता येईल याबाबत सुचना दिल्या. याकामी स्थानीक आरोग्य प्रशासन, नगरपरीषद, व पोलीस प्रशासन यांनी संगनमताने काम करावे. कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करून आपआपली जबाबदारी प्रामाणीकपणे पार पाडावी व काही कमतरता अथवा अडचणी आल्यास ती बिनधास्त सांगावी त्वरीत ऊपलब्ध करण्यात येईल असेही सलील देशमुख यांनी सुचवीले. दरम्यान गावातील काही नागरीकांनीही आपल्या समस्या मांडल्या. यावेळी मोवाड येथील राकाॅ कार्यकर्ते सोहेल शेख, मंगेश नासरे, विवेक लिखार, रवींद्र भंदीर्गे, दिलीप बनाईत, संजय करीये, महीला कार्यकर्त्या रंजना सोळंकी, निर्मला वैद्य, आरती करीयेसह मोवाड नगरपरीषद, आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासनाचे स्थानीक अधीकारी, तसेच राष्र्टवादी काॅंग्रेस पक्षाचे पदाधीकारी यावेळी अपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here