अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने करून दिल मामाशी लग्न.

54

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने करून दिल मामाशी लग्न.

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने करून दिल मामाशी लग्न.
अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने करून दिल मामाशी लग्न.

पुणे जिल्हा, प्रतिनिधी ✒
पुणे,दि.17:- पुणे जिल्हातील शिरूर तालूक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडू राज्यात एका अल्पवयीन मुलीचा तिच्या आईने जबरदस्तीने तीच्या मामा बरोबर लग्न करुन दिल्याची घटना घडली. मात्र, सदर पीडित तरुणी हि तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथे वास्तव्यास असल्याने युवतीच्या सतर्कतेने या घटनेला वाचा फुटली. शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये मुलीचा आई शशिकला सेलवन व तरुणीचे पती झालेला मामा शामसुंदर जर्ज या दोघांविरुध्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्रापूर पोलिसांनी पीडित युवतीची आई शशिकला सेलवन व युवतीचा पती झालेला मामा शामसुंदर जर्ज (दोघे रा. करंबविल्हई ता. चीरतंदूर जि. तूतुकुडी राज्य तामिळनाडू) यांच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्हा पुढील तपासासाठी पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण कार्यालयच्या वतीने तामिळनाडू राज्याच्या तूतुकुडी पोलिसांकडे रवाना करण्यात आला आहे.