नागपुरमध्ये रेमडेसिवीरचा मोठा प्रमाणात काळाबाजार, डॉक्टरसह चौघांना अटक.
नागपुरमध्ये रेमडेसिवीरचा मोठा प्रमाणात काळाबाजार, डॉक्टरसह चौघांना अटक.

नागपुरमध्ये रेमडेसिवीरचा मोठा प्रमाणात काळाबाजार, डॉक्टरसह चौघांना अटक.

नागपुरमध्ये रेमडेसिवीरचा मोठा प्रमाणात काळाबाजार, डॉक्टरसह चौघांना अटक.
नागपुरमध्ये रेमडेसिवीरचा मोठा प्रमाणात काळाबाजार, डॉक्टरसह चौघांना अटक.

✒युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.17 एप्रिल:- आज नागपुर हर रोज मोठ्या प्रमाणात करोना बांधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज हजारोच्या वर रुग्ण मिळत असल्याने आरोग्य यंत्रनेवर मोठ्या प्रमाणात तान पढत आहे. तर काही ठिकाणी बेडची कमतरता असल्यामुळे एक बेड वर दोन कोरोना वायरस बांधीत रुग्णांचा इलाज सुरु असल्याचे समोर आहे आहे. नागपूमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशातच रुग्णांच्या उपचारात लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसुन येत असल्याचे समोर आले आहे. याचाच गैरफायदा घेऊन अनेक समाजद्रोही लोक काळाबाजार करुन लोकाची लूट करत आहे.

नागपूर शहर पोलिसांनी सापळा रचून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात सुरु असलेला काळाबाजार समोर आणला. यात कामठी शहरातील आशा हॉस्पिटल मध्ये कार्यरत एका समाजद्रोही डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

नागपूरात रोज मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस बांधीत रुग्णांची भर पडत असल्याने काळाबाजार करणा-या डॉक्टर आणि लोकांचे सुगीचे दिवस आले असल्याचे दिसुन येत आहे. नागपुर जिल्हातील कामठी शहरात सुरू असलेला रेमडेसिवीरचा काळाबाजार उघडकीस आणून पोलिस उपायुक्त निलोत्पल यांचे विशेष दल आणि जुनी कामठी पोलिसांनी डॉक्टरसह चौघांना अटक केली. त्यांच्याकडून 15 रेमडेसिवीर इंजेक्शन पोलिसांनी जप्त केले आहे. नागपुर पोलिसांनी काळाबाजार करणा-या समाजद्रोही डॉक्टरावर केलेल्या कारवाईमुळे आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. काळाबाजारी करणारा डॉ. लोकश शाहू, शुभम मोहदरे, कुणाल कोहळे व सुमित भांगडे, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश हे आशा हॉस्पिटलमध्ये ‘व्हिझिटिंग’ डॉक्टर असून शुभम व कुणाल हे वर्धा मार्गावरील स्वास्थम हॉस्पिटलमध्ये व सुमित हा वानाडोंगरीतील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आहे. आशा हॉस्पिटलमधील डॉ. लोकेश शाहू हे रेमडेसिवीरचा काळाबाजार करीत असून ते त्याची 16 हजार रुपयांमध्ये विक्री करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली. अमितेशकुमार यांनी पोलिस उपायुक्त निलोत्पल यांना डॉक्टरला पकडण्याचे निर्देश दिले.

निलोत्पल यांचे विशेष पथक व कामठी पोलिसांनी सापळा रचला. रूग्णाचे नातेवाइक बनून पोलिसांनी डॉ. लोकेश यांच्याशी संपर्क साधला. लोकेश यांनी एक इंजेक्शन 16 हजार रुपयांना मिळेल, असे रूग्णाचे नातेवाइक बनलेल्या पोलिसाला सांगितले. त्याने पोलिसाला कामठीतील ड्रॅगन पॅलेस परिसरात बोलाविले. एक पोलिस रूग्णाचा नातेवाइक बनून तेथे गेला. लोकेश याच्याकडून रेमडेसिवीर घेतले. पोलिसांनी लोकेश व शुभम याला अटक केली. त्यांच्याकडून दोन रेमडेसिवीर जप्त करण्यात आले.

दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली. रेमडेसिवीर कुणाल याने दिल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कुणाल याला अटक केली. त्याच्याकडून सात तर सुमित याच्याकडून सहा रेमडेसिवीर जप्त करण्यात आले. या प्रकरणात एका परिचारिकेचीही भूमिकाही संशयास्पद असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here