सडक अर्जुनी येथील कोविड सेंटरमधील आरोग्य अधिकाऱ्याला लाथाबुक्यानी मारहाण.

✒गोपाल अग्रवाल, सडक अर्जुनी तालुका प्रतिनिधी✒
गोंदीया,दि.17 एप्रिल:- गोंदीया जिल्हातील सडक अर्जुनी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सडक अर्जुनी येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात स्थापित करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी काल कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या घटनेतील आरोपीला डुग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे.

गोंदीया जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सडक अर्जुनी येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर स्थापीत करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये गुरुवारी सकाळी च्या सुमारास कोहमारा येथील दिनेश श्रीराम मसराम कुटुंबासह चाचणीसाठी आले होते. त्यानंतर 3 वाजून 40 मिनिटांनी रिपोर्ट लवकर द्या, म्हणून त्याने कोविड सेंटरचे कर्मचारी भौतिक देवराज वैद्य यांच्याशी वाद घातला. आणि लाथाबुक्यांनी मारहाण करण्याला सुरुवात केली.

कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. विनोद भुते हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनासुद्धा दिनेश मसरामने शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे, तर पुढे पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी डॉ. विनोद भुते यांच्या तक्रारीवरून आरोपी दिनेश मसराम याच्याविरुद्ध डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here