स्व. अर्जून सोनकुसरे स्मृतिप्रित्यर्थ साकोलीत रक्तदान शिबीराचे आयोजन…
आशिष चेडगे
साकोली तालुका प्रतिनिधी
8605699863
साकोली : स्व. अर्जून सोनकुसरे स्मृतिप्रित्यर्थ पटमैदान सिव्हील वार्ड साकोली येथे १७ एप्रिलला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. येथे एकुण ३८ रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान करून स्व. अर्जून सोनकुसरे यांना श्रद्धांजली वाहली हे विशेष.
भटके विमुक्त जाती, बेलदार समाजाचे माजी अध्यक्ष स्व. अर्जून सोनकुसरे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पटमैदान येथे रक्तदान शिबीरात प्रमुख उपास्थितीत डॉ. हेमकृष्ण कापगते माजी आमदार, राजेश काशिवार माजी आमदार, राजेंद्र दोनाडकर उपाध्यक्ष भटके विमुक्त जाती विदर्भ, दिलीप चित्रीवेकर सचिव भटके विमुक्त जाती विदर्भ प्रांत, प्रकाश बाळबुद्धे, डॉ. दिपक चंदवाणी, डॉ. अजयराव तुमसरे, डॉ. अतुल दोनोडे, डॉ. राजेश चंदवाणी, प्रदीप गोमासे आदी हजर होते.
या शिबीरात आरोग्य सेवाकर्ते डॉ. दिपक चंदवाणी, डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ. अतुल दोनोडे, विनय ढगे, सरीता गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर अँड मनिष कापगते, सपन कापगते, प्रा. अमोल हलमारे, आशिष गुप्ता, हेमंत भारद्वाज, किशोर बावणे, पुनम चांदेवार, पत्रकार मनिषा काशिवार यांनी सर्वांचे स्वागत केले. रक्तदान शिबीरात एकुण ३८ महिला पुरूष रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी बेलदार समाजाचे अध्यक्ष सिमल बोकडे, अण्णा सोनकुसरे, बंटी सोनकुसरे, गणेश बोकडे, शुभम सोनकुसरे, विशाल सोनकुसरे, गोपाल लुहिया, बलराज सोरते, सारीका सोरी, सविता बोकडे, सुमन सोनकुसरे, अंजना सोनकुसरे, मालती सोनकुसरे, नेहा बोकडे, नुरी सोनकुसरे, जानकी बोकडे, सरीता सोनकुसरे, सोनू बोकडे, आनंद सोरते, अमर बोकडे, भारत सोनकुसरे, राजेश बोकडे, शिवा बोकडे यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरात रक्तदाते नोंदणी व संकलन चॅलेंजर क्रिकेट संघाचे अतुल डोंगरे सतिश नंदेश्वर रवि शहारे गोलू राऊत व सदस्यगणांनी सहकार्य केले. संचालन बंटी सोनकुसरे तर आभार तिलक सोनकुसरे यांनी मानले.