अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षपदी शशिकांत दुसाने
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा,प्रतिनिधी – अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी शशिकांत दुसाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ओबीसी महासंघाचे अध्यक्ष रविकुमार स्वामी व राष्ट्रीय सचिव कुमार कुंभार यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दर्जी आणि प्रदेश कार्याध्यक्ष संतोष पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन महासंघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.शशिकांत दुसाने हे पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील रहिवासी आहेत.
दुसाने नियुक्तीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, मला जी जबाबदारी देण्यात आली आहे ती पूर्ण करण्यासाठी तसेच ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांच्या या नियुक्तीनंतर मित्र परिवार, नातेवाईक, हितचितकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.