सीमा जावळे यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड

सुनील भालेराव 

कोपरगांव प्रतिनिधी 

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील आबासाहेब गोकुळ जावळे यांची कन्या सीमा जावळे हिची महाराष्ट्र लोकसेवा मार्फत घेतलेला परीक्षेतून तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असताना पहिल्याच प्रयत्नामध्ये तिने यश संपादन केले आहे .

स्पर्धा परीक्षेसाठी पुणे येथे ती अभ्यास करत होती .तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत तालुका कृषी अधिकारी पदी यश संपादन केले तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सोनेवाडी तसेच माध्यमिक शिक्षण कर्मवीर शंकरराव काळे विद्यालय सोनेवाडी येथे झाले होते तसेच ती एस जी एम कॉलेजची विद्यार्थिनी होती .तिचे पदवीचे शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत शिवाजीनगर पुणे येथे पूर्ण झाले होते.

आमदार आशुतोष काळे मा. काकासाहेब जावळे गौतम बँकेचे अध्यक्ष मा.सुधाकर दंडवते .उपाध्यक्ष मा. बापूसाहेब जावळे प्रशासकीय अधिकारी मा. बापूसाहेब घेमुड मुख्य कार्यकारी अधिकारी मा.पावडे,  राहुल जावळे वैभव जावळे, बँकेचे अधिकारी व कर्मचारी आदींसह सोनेवाडी पंचक्रोशेतून तिचे अभिनंदन करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here