ज्युनियर कॉलेज दिघी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ज्युनियर कॉलेज दिघी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

✍️सचिन मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
8698536457

दिघी- माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा समतेचा पुरस्कर्ता, संविधानाचे अधिवक्ता, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्राचे तर्कशुद्ध आधुनिक भारताचे उद्दगाते, शिक्षणतज्ञ, समता, स्वातंत्र्य, बंधुतेची शिकवण देणारे, महामानव, युगपुरुष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांची १३४ वी जयंती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज दिघी* येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमला दिघी शाळा व काॅलेज चे मुख्याध्यापक माननीय श्री.सचिन सतिश मापुस्कर सर* हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते आंबेडकर च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यानंतर शाळेतील सहाय्यक शिक्षिका मृणालिनी श्रीनिवास नागावकर व राबीया गझाली यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी मधून आपले मनोगत व्यक्त करुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.त्यानंतर मापुस्कर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या आंबेडकर यांच्या गुरुमंत्राची आठवण करून देत मुलांना अवांतर वाचन खुप करा आणि मोबाईल चा वापर कमी करा हा सल्ला दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी खुप मेहनत घेतली व या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रध्दा कृष्णकांत पिळणकर मॅडम यांनी केले.