कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना लवकर करा: खासदार अशोक नेते

50

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना लवकर करा: खासदार अशोक नेते

दुर्गम भागातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करून लसीकरण वाढावा चमोर्शीच्या कोविड आढावा बैठकीत खा.अशोक नेते यांनी दिले निर्देश.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना लवकर करा: खासदार अशोक नेते
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना लवकर करा: खासदार अशोक नेते

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चामोर्शी :- तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असून रुग्णावर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक आहे त्यासाठी लसीकरण केंद्र वाढविन्यात यावे, तसेच गावांमध्ये जाऊन नागरिकांना प्रोत्साहित करून लसीकरण करण्यात यावे तसेच नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने शिबिर घेऊन जनजागृती करण्यात यावी, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर व लसीकरण च्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले. तसेच कोरोना बाधीत रुग्णाना योग्य उपचार देऊन त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांना लसीकरण साठी प्रोत्साहन देण्याचे निर्देशही यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले.

तसेच कोरोना बाधीत रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी मिळाल्यानंतर त्यांना कारंटाईन सेंटर किंवा गृह विलगीकरण मध्ये 14 दिवस ठेवण्यात यावे, जेणेकरून तो बाहेर फिरणार नाही व पुन्हा तो बाधीत निघाल्यास इतरांना त्याच्यापासून धोका होणार नाही. तसेच गावातील दक्षता समितीने गावातील बाधीत व संशयीत नागरिकांची माहिती प्रशासनास द्यावी यासाठी त्यांना ऍक्टिव्ह राहण्यास सांगावे असे निर्देशही यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले.

खासदार अशोक नेते यांनी कोविडच्या परिस्थिती बाबत चामोर्शी तालुक्याचा आढावा घेतला असता आजपर्यंत चामोर्शी तालुक्यात 16596 नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली असून एकूण बाधीत 1239 रुग्ण झाले असून यावर्षी 273 रुग्ण कोरोना बाधीत झाले व सद्यस्थितीत 62 रुग्ण बाधीत आहेत. तसेच आतापर्यंत 45 वर्षावरील नागरिकांना 1 डोज 11471 जणांना दिले असून दुसरा डोज 1451 जणांना देण्यात आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.

गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 17 मे रोजी चामोर्शी नगर पंचायत कार्यालयात तालुक्यातील कोविड परिस्थिती बाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिप चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाशजी गेडाम, प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सदस्य संदीपजी कोरेत, तालुका अध्यक्ष दिलिपजी चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, भाजपचे ज्येष्ठ नेते जयराम चलाख, नगर पंचायत सभापती, नगरसेवक, चामोर्शी चे उपविभागीय अधिकारी तोडसाम , तहसीलदार शिकतोडे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीकारी , नगर पंचायती चे मुख्याधिकारी चौधरी, व अन्य प्रमुख अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.