दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
भद्रावती :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर यांच्या नेतृत्वात “केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस, व जीवनावश्यक वस्तूंची होणारी दरवाढ तसेच नुकतीच रासायनिक खतांच्या किमतीत केलेली 40% दरवाढीच्या ” स्थानिक तहसील कार्यालयासमोर नायब तहसीलदार भांदक्कर साहेब यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खतांच्या किंमती 40% नी गगनाला भिडल्या. त्यामुळे मागील एक वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. 100 रुपयांच्या वर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. ही केलेली दरवाढ तात्काळ कमी करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ऍड. युवराज धानोरकर, शहर अध्यक्ष सुनिल महाले, कामगार सेल जिल्हा अध्यक्ष फय्याज शेख, युवक शहर अध्यक्ष रोहन कुटेमाटे, साबिया शेख, परवेज अहमद यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.