गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांना अहेरी शहराच्या मुख्य मार्गाचे रुंदीकरण करण्याबाबतचे निवेदन देतांना
गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख व आरमोरी विधानसभा जिल्हा प्रमुख
मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.९४०५७२०५९३
दिनांक १६/०५/२०२२ रोजी गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री मा.किशोर पोद्दार साहेब व अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री मा.रियाज भाई शेख व आरमोरी विधानसभा चे जिला प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री मा.ना. एकनाथ शिंदे साहेब यांना मुंबई येथे भेट घेऊन अहेरी जिल्ह्याचा मुख्य मार्गाचे रुंदीकरण करण्याबाबतचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की भुजंगराव पेठ-विश्वासराव महाराज चौक ते दक्षिण मुखी हनुमान मंदिर ते प्रभूसदन (प्राणहिता कॅम्प) पर्यंत ते विश्वासराव महाराज चौक ते गडअहेरी (पंचायत समिती मार्ग) या मुख्य मार्गाचे रुंदीकरण करून दुभाजक लावून एकेरी मार्ग करण्यात यावे. अहेरी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आणि अहेरी विभागातील सर्व कार्यालय इथेच असल्याने रहदारीत आणि दळणवळणात अधिक प्रमाणात वाढ झाली असल्याने वर्दळ वाढली आहे.
अहेरी शहरात मुळता अंतर्गत सर्व मुख्य रस्ते हे अरुंद असल्यामुळे ये-जा करण्याकरता वाहनांच्या पार्किंगची सोय नसल्याने दुचाकी व चारचाकी व इतर मोठे वाहने रस्त्यावर उभी ठेवली जातात त्यामुळे रस्ता पूर्ण बंद होऊन (ट्राफिक जाम) जनतेला या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. याच कारणाने येथील लोकांना याचा अतिशय त्रास भोगावा लागत आहे त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अहेरी विभागातील मुख्य रस्ते रुंद करून जनतेचा त्रास कमी होईल जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि ये-जा करण्यास सोयीस्कर होईल व अहेरी जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल.