मौजा कॉंन्द्री येथे पंधराव्या वित्त आयोगाची कामे न करता निधीची केली उचल
✍ मिथुन लिल्हारे ✍
तालुका प्रतिनिधी मोहाडी
📱8806764515 📱
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणारे मौजा काँन्द्री येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचे नियोजन करून ठराव नसतांना मंजूर करण्यात आले. मात्र संबंधितांनी नियोजीत कामे पूर्ण न करता निधीची अफरातफर केल्याचा प्रकार मासिक सभेत १५ व्या वित्त आयोगाचा जमाखर्च सादर करतांना उघडकीस आला. ग्रामीणसाठी मुलभूत सुविधा निर्माण करून त्यांचे जिवन मान उंचावण्यासाठी शासनाने पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून थेट निधी ग्रामपंचायतीला दिला. त्यानुसार २०२१-२०२२ वर्षातील उपलब्ध निधी अंतर्गत कांन्द्री ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेसाठी सोलरपंप खरेदी करने ५ लाख, सोलर लावने १ लाख, कचराकुंडी खरेदी करने २ लाख ८९ हजार ८५९ रुपये, जिल्हा परिषद शाळेत सोलर पॅनल लावने २ लाख ९ हजार ७८९ रुपये, अंगणवाडी क्रमांक ३ डिजीटल करने १ लाख ३ हजार ९१५ पयांच्या कामाचे नियोजन केले.
कंत्राटदाराच्या निविदा ग्रामपंचायतीने सर्वानुमते ठरावासह मंजूर केल्या. त्यानुसार निविदाधारकाने सदर काम तातडीने पूर्ण करने गरजेचे होते. मात्र कामे झालेली नाहीत. अद्यापही अपूर्ण आहेत. निधी खर्च झाला. पण कामे झाली नाहीत. त्यामुळे पैसा गेला कुठे ? हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहेत.
ग्रामपंचायत अधिनियमानुसार कामे झाल्याशिवाय निविदा धारकाला कोणत्याही प्रकारचे देयक देता येत नाही. मात्र काँन्द्री येथील सरपंच शालु मडावी व सचिव शेंडे यांनी नियम धाब्यावर बसवून पदाचा गैरवापर केला. असा आरोप होत आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच, सचिवास याबाबद विचारणा केली असता , त्यांनी वेळ मारून नेली.
म्हणून या प्रकरणात गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी उपसरपंच प्रमेश नलगोपुलवार, सदस्य विजय बारई यांनी सीईओंकडे एका तक्रारितून केली आहे.
पूढील सविस्तर तपास सीईओंकडे असल्याने लवकरात लवकर या प्रकरणाच्या चौकशीचे काम सुरू करावे अशी विनंती केली आहे.