गडचांदुर जवळ एसटी महामंडळ बसच्या धडकेत युवकाचा गेला जीव
हेमा मेश्राम
दुर्गापूर शहर प्रतिनिधी
मो.न.9356653707
सविस्तर या प्रमाणे,राजुरा कोरपना आदिलाबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ब असून हा महामार्ग अपघात ठळक मार्ग आहे या महामार्गावर नेहमीच अपघात होत असतात.
आज १७ मे २०२२ ला कोरपना कडून गडचांदूर मार्गाने येणाऱ्या महामंडळ च्या बस क्रमांक MH 13 CU 6339 या बस नी गडचांदूर जवळ सोनुरली येथील निखिल पत्रकार वय २३ वर्ष याला धडक दिली त्या धडकेत निखिल चा जागीच मृत्यू झाला.
२ दिवसापूर्वी याच महामार्गावर गडचांदूर जवळ राजुरा येथील वनिता चिडे या महिला प्राध्यापिकेचा असाच धडकेत जागीच मृत्यू झाला होता त्याच शोककुळेत ही दुसरी घटना परत त्यात ठिकाणी घडल्यानी सर्वी कडे शोककूळ व्यक्त करीत आहे. गडचांदुर पोलिसांनी घटनेस्थळी जाऊन पंचनामा केला पुढील तपास सुरू आहे.