वडील ओरडले म्हणून रागाने निघून गेलेली विशाखा सापडली

महाड एमआयडीसी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,  24 तासात बेपत्ता विशाखाचा लावला शोध

 रामदास चव्हाण

बिरवाडी महाड प्रतिनिधी 

मो: 72767 05457

महाड: महाड तालुक्यातील आमशेत गावातून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिनांक 15 मे रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना सर्वत्र पसरताच उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली. अल्पवयीन मुलीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी होती.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या 24 तासांमध्ये बेपत्ता विशाखाचा शोध लावला. वडील रागावले म्हणून विशाखाने घर सोडलं आणि तिने थेट मुंबई गाठली. मुंबईहून ती साताऱ्याला जाणार होती अशी माहिती विशाखाने पोलिसांना दिली. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे यांनी या तपासाची सूत्रे हाती घेतली आणि या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला.

पोलीस उपनिरीक्षक नागदिवे यांच्या समवेत पोलीस हवालदार विनोद पवार, महिला पोलीस हवालदार निलीमा गायकवाड, महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या दरेकर यांनी बेपत्ता मुलीच्या तपासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here