जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद

67

*जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद

मिडीया वार्ता न्यूज
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विशाल सुरवाडे*

दि.17/06/2021:जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत असून आतापर्यंत जिल्ह्यात 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.असे कृषि विभागा मार्फत कळविण्यात आले आहे. हा पाऊस पेरणीपूर्व मशागत व पेरणीसाठी पुरक ठरणार असला तरी तो पेरणीसाठी पुरेसा नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन कृषि विभागाने केलेले आहे.
कृषि आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 719.7 मिलीमीटर इतके आहे. तर जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.7 मिलीमीटर इतके असून आतापर्यंत जिल्ह्यात 49.9 मिलीमीटर म्हणजेच जून महिन्याच्या सरासरीच्या 40.7 टक्के इतका पाऊस पडला आहे.
जिल्ह्यासाठी जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मिलीमीटर, जुलै 189.2 मिलीमीटर, ऑगस्ट 196.1 मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.6 मिलीमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान हे 632.6 मिलीमीटर असल्याचे कृषि विभागा तर्फे कळविण्यात आले आहे.