*जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा बल्लारपूर शहराची आढावा बैठक संपन्न*.

सौ.हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपुर
Mo 9764268694
गुरुवार, दि. १७ जुन.
भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहर यांचेवतीने स्थानिक जनसंपर्क कार्यालयात जिल्हा भाजपच्या सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून ते पुढे होऊ घातलेल्या कार्यक्रमांचे पूर्वनियोजन व शहरातील पक्षसंघटनेच्या रचनात्मक दृष्टीने आढावा बैठक जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पार पडली.
पक्षसंघटनेच्या विस्तारासाठी सामाजिक कार्यक्रमांत कार्यकर्त्यांची सक्रियता ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याने प्रत्येक सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे. असे अधोरेखित करत, पक्षबांधणीसाठी महत्वपूर्ण अशा अनेक पैलूंवर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थितांना चर्चात्मक मार्गदर्शन केले.
तसेच याप्रसंगी हरीशजी शर्मा, आशिष देवतळे व काशीनाथ सिंह यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या बैठकीला, बल्लारपूरचे नगराध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, शहराध्यक्ष काशिनाथ सिंह, प्रदेश कामगार आघाडीचे महामंत्री अजय दुबे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, राजू दारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्या रेणुकाताई दुधे, न.प. चे आरोग्य सभापती येलेय्या दासरफ, मनिष पांडे, नगरसेविका जयश्री मोहुर्ले, चौधरी ताई, रनंजय सिंह, सतिश कनकम, देवेन्द्र वाडकर, ईश्वर मोहुर्ले, गुलशन शर्मा, मिथिलेश पांडेय, सुरेंद्र खडका, सतिश कनकम, किशोर मोहुर्ले, देवेन्द्र वाटकर, मनीष रामिल्ला, रिंकू गुप्ता, श्रीकांत आंबेकर, सोशल मीडियाचे आदित्य शिंगाडे, नीरज झाडे, सलीम भाई, राजेश कैथवास, आदींसह नगरसेवक, नगरसेविका व स्थानिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.