प्रतिभाताई धानोरकर यांच्या कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या काही कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेटी*

55

*प्रतिभाताई धानोरकर यांच्या कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या काही कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेटी*

प्रतिभाताई धानोरकर यांच्या कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या काही कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेटी*
प्रतिभाताई धानोरकर यांच्या कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या काही कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेटी*

त्रिशा राऊ
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमूर (वरोरा) : -कोरोनाचा दुसऱ्या लाटेत सबंध देशात मोठ्या प्रमाणात नागरिक मृत्यूमुखी पडले.वरोरा शहरानेही कोरोनाची त्रासदी अनुभवली. कोरोनाच्या या महामारीत आपण सुध्दा अनेक नातलग, सहकारी, प्रियजनांना गमावले. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचेसोबत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या काही कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेटी दिल्या. अन् मन दुःखी व निशब्द झाले. कुठे, कुटुंबातील कर्ता माणूस मृत्यू पावल्याने कुटुंब उघड्यावर पडले. तर कुठे सत्तर वर्षीय आजीवर नातवाला सांभाळण्याची पाळी आली… बावने लेआऊट मधील दिड वर्षाच्या निरागस मुलीचे पित्रृछत्र हरपल्याने तिच्या आईचा आक्रोश बघुन मन सुन्न झाले. नियती ऐव्हढी क्रुर कशी होऊ शकते असा प्रश्न वारंवार पडत होता.
या परीवारांची झालेली हानी कधीही न भरून निघणारी आहे. या कुटुंबियांच्या दुःखात आमदार प्रतिभाताई धानोरकर सहभागी होऊन त्यांना धीर दिला. या कुटुंबियांना सहकार्याचा विश्वासही यावेळी दिला.