सासरच्या छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या; सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल.

✒हिंगोली जिल्हा प्रतिनिधी✒
हिंगोली,दि.17 जुन:- हिंगोली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगोली तालुक्यातील येथील रमा सिद्धार्थ भोरगे हीस पती सिद्धार्थ, सासू देवूबाई, सासरा दलित, दीर भीमा, जाऊ इंदू भोरगे यांच्यासह मावस सासरा शिवाजी घोंगडे सर्व रा.केसापूर यांनी 4 फेब्रुवारी 2019 पासून ते आजतागायत विविध कारणांनी छळ करत होते. तू आंधळी आहेस, तुझ्या माहेराहून पैसे आण व घर बांध. त्याच घरात तू राहा व आमच्या घरात राहू नको, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून रमाने घरातील लाकडी बल्लीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिची नातेवाईक कांताबाई सोपान बलखंडे यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून हुंड्यासाठी छळासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. सपोनि गिरी तपास करीत आहेत.