नांदेड येथे बापाने केला पोटच्या नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार.

26

नांदेड येथे बापाने केला पोटच्या नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार.

नांदेड येथे बापाने केला पोटच्या नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार.
नांदेड येथे बापाने केला पोटच्या नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार.

✒नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी✒
नांदेड,दि.17 जुन:- नांदेड़ जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संतापाचे वातावरण आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार 15 जूनच्या मध्यरात्रीनंतर 3 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

16 जूनच्या रात्री 1 वाजता नांदेड ग्रामीण पोलिसांनी या आरोपी बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका आईने दिलेल्या तक्रारीनुसार, 15 जूनच्या रात्री तिच्या 9 वर्षीय मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्याने, तिने घरात जाऊन पाहिले असताना, बालिकेने सांगितले, तिच्या बापानेच तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आहे. आईने आपल्या पतीला याबाबत विचारणा केली, तेव्हा ही बालिका माझी नाही, असे सांगत त्याने पत्नीलाही मारहाण केली. सायंकाळी आईने आपल्या मुलींना सोबत घेऊन माहेर गाठले. तिला एकूण चार मुली आहेत. सर्वांत लहान बालिका 9 वर्षांची आहे. तिच्यावरच बापाने लैंगिक अत्याचार केला आहे.

घाबरलेली आई अगोदर वजिराबाद पोलीस ठाण्यात गेली होती. वजिराबाद पोलिसांनी सर्व माहिती जाणून घेतल्यावर घटना घडली, ती जागा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांना नांदेड ग्रामीणचे पोलीस बोलावून तिकडे पाठविले. नांदेड ग्रामीण ठाण्यात बापाविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गणेश होळकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपी बापाला गजाआड केले आहे.