महीलेने मास्क नाही लावला, महीलेला ताब्यात घेऊन पोलिसाने केला बलात्कार.

52

महीलेने मास्क नाही लावला, महीलेला ताब्यात घेऊन पोलिसाने केला बलात्कार.

महीलेने मास्क नाही लावला, महीलेला ताब्यात घेऊन पोलिसाने केला बलात्कार.
महीलेने मास्क नाही लावला, महीलेला ताब्यात घेऊन पोलिसाने केला बलात्कार.

✒MVN क्राईम रिपोर्टर✒
गुजरात,दि.17 जुन:- गुजरात राज्यातील सुरत येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संतापाची लाट पसरली आहे. भारतात सर्वीकडे कोरोना महामारीने कहर केला आहे. कोरोना वायरस महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. मास्क न लावल्यास दंड वसूल केला जात आहे. याच दरम्यान काही भयंकर घटना समोर येत आहे. अशीच एक बातमी गुजरातमधील सुरतमध्ये एका महीलेने मास्क लावला नाही म्हणून पोलीस हवालदाराने आपल्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. मास्क न घालता फिरत असल्याच्या कारणावरुन या हवालदाराने पीडित महिलेला ताब्यात घेतलं होतं. सुरत येथील उमरपाडा पोलीस स्थानकामध्ये हा हवालदार कार्यरत आहे.

या पोलीस हवालदाराने मास्क न घातल्याचं कारण देत या महिलेला अडवलं आणि कारवाई करण्याची धमकी देत तिला ताब्यात घेतलं. या महिलेला पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी तो तिला नवसारी रोड येथील निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे बेशुद्ध केलं. त्यानंतर मारहाण केली आणि बलात्कार देखील केला असा आरोप महिलेने केल आहे.  या पोलीस हवालदाराने नंतर पुढे अनेक महिने तो माझ्यावर वारंवार बलात्कार करायचा असं देखील म्हटलं आहे. महिलेने हवालदारावर बलात्काराचा आरोप केलेला असतानाच हवालदाराच्या पत्नीने पीडित महिला जातीवरुन आरोप करत असल्याचा दावा केला आहे. नरेश कपाडिया असं असं आरोप करण्यात आलेल्या पोलिसांचं नाव आहे. त्यामुळेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.