टेस्ट क्रिकेटचा पहिला वर्ल्डकप कोण जिंकणार? भारत वि. न्यूझीलँड ऐतिहासिक सामना १८ जूनपासून होणार सुरु

51

टेस्ट क्रिकेटचा पहिला वर्ल्डकप कोण जिंकणार? भारत वि. न्यूझीलँड ऐतिहासिक सामना १८ जूनपासून होणार सुरु

टेस्ट क्रिकेटचा पहिला वर्ल्डकप कोण जिंकणार? भारत वि. न्यूझीलँड ऐतिहासिक सामना १८ जूनपासून होणार सुरु
टेस्ट क्रिकेटचा पहिला वर्ल्डकप कोण जिंकणार? भारत वि. न्यूझीलँड ऐतिहासिक सामना १८ जूनपासून होणार सुरु

✒मनोज कांबळे, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई, दि. 17 जून:- टेस्ट क्रिकेटच्या १३४ वर्षांच्या इतिहासातल्या पहिल्यावाहिल्या वर्ल्डकपचा अंतिम सामना १८ जूनपासून इंग्लंड मधील साऊथहॅम्पटन येथे सुरु होणार असून प्रतिस्पर्धी देश भारत आणि न्यूझीलँड सोबतच जगभरातल्या क्रिकेट चाहत्यामंध्ये या सामन्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

टेस्ट क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी आयसीसीने जुलै २०१९ पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप स्पर्धेला सुरुवात केली होती. दोन वर्षे चाललेल्या या स्पर्धेमध्ये नऊ टेस्ट क्रिकेट देशांनी ६१ सामने खेळल्यानंतर भारत आणि न्यूझीलँड ऍव्हरेज पॉईंटच्या हिशोबाने अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. या ऐतिहासिक सामन्यासाठी दोन्ही संघ साऊथहॅम्पटन मधील रोझ बाउल स्टेडियम मध्ये कसून तयारी करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारतीय आणि न्यूझीलँड संघांची आयसीसी स्पर्धांमधील सेमीफायनल आणि फायनल मधील कामगिरी निराशजनक राहिली आहे. भारतीय संघाला २०१५ वनडे वर्ल्डकप सेमी फायनल, २०१७ वनडे चॅम्पियन ट्रॉफी फायनल , २०१६ टि-२० वर्ल्डकप सेमी फायनल आणि २०१९ वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे न्यूझीलँड २०१५ आणि २०१९ वनडे वर्ल्डकप फायनल मध्ये हार पत्कारल्यानंतर पुन्हा एकदा एक आयसीसी स्पर्धेची फायनल खेळण्यास सज्ज झाला आहे. या मॅचसाठी अंतिम पंधरा जणाच्या टीम दोन्ही देशांनी १५ जूनला जाहीर केल्या होत्या.

भारतीय संघ: विराट कोहली (कप्तान), अजिंक्य रहाणे (उपकप्तान), रोहीत शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, महम्मद शामी, महम्मद सिराज

न्यूझीलँड संघ: केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डोवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोमे, मॅट हेन्नरी, काइल जॅमीसन, टॉम लँथम, हेन्नरी निकोल्स, एजाज पटेल, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

18 जूनला भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडे तीनला ही मॅच सुरू होणार आहे. पण, साऊथहॅम्पटनमध्ये मॅचच्या पाचही दिवसांसाठी 70-90% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने मॅच पूर्ण होईल कि नाही ही शंका क्रिकेट प्रेमींकडून उपस्थित केली जातेय. पाच दिवसांच्या खेळात पावसामुळे अडथळा आल्यास उर्वरित ओव्हर्स सामन्याच्या सहाव्या दिवशी म्हणजे २३ जूनला खेळवण्यात येतील, असे आयसीसीने जाहीर केले आहे.