आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या शुभहस्ते नगर परिषद, नागभीड अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड—दि. १६ जून/ आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या शुभहस्ते नगर परिषद, नागभीड अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले.
नगर परिषद नागभीड च्या वतीने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे विविध विकासकार्याबद्दल विशेष स्वागत व शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, उपस्थित नागभीड वासीय जनतेने आभार मानले.
तसेच, आमदार बंटीभाऊंनी रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत नागभीड नगर परिषद क्षेत्रातील अनेक लाभार्थ्यांना धनादेश (चेक) वाटप केले व विविध विषयांवर संबोधित केले.
विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
नगर परिषद, नागभीड समोरील बाजार ओटे व दुकान गाळ्यांचे लोकार्पण.
• टि – पॉईंट नागभीड ते तुकूम पर्यंत दुतर्फा स्ट्रिट लाईटचे लोकार्पण.
%• न.प. क्षेत्रातील पाण्याच्या टाकीचे लोकार्पण.
• रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप.
• श्री राम मंदिर, नागभीड ते शिवटेकडी पर्यंत दुतर्फा स्ट्रिट लाईटचे भुमीपूजन.
• दलित वस्ती योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक १ व ७ येथील सिमेंट रोड व नाली बांधकामाचे भुमीपूजन.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजयभाऊ गजपुरे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, नगराध्यक्ष न.प. नागभीड प्रा. उमाजी हिरे, मुख्याधिकारी न.प. नागभीड कंकाड, सभापती कृ.ऊ.बा. समिती नागभीड आवेश पठाण, उपाध्यक्ष न.प. नागभीड गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, भाजपा तालुका महामंत्री जगदीश सडमाके, नगरसेवक शिरीष वानखेडे, नगरसेवक दशरथ उके, नगरसेवक रुपेश गायकवाड, नगरसेवक गौतम राऊत, नगरसेविका दुर्गा चिलबुले, नगरसेविका प्रगती धकाते, अनिल लांबट, गुलजार धम्मानी, विजय काबरा, हनिफ ज्यादा, अशोक वारजूकर, जयंती भाई पटेल, ईश्वर मेश्राम, आनंद भरडकर, आनंद कोरे, मोजेस मरकाम, अर्चना मरकाम व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.