वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू
🖋अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
आरमोरी : – आरमोरी तालुक्यातील इंजेवारी वनपरिक्षेत्रात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वासुदेव मुरलीधर मेश्राम (३६) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवार, १६ जून रोजी सकाळी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व शवविच्छेदन करून कुटुंबीयांना मृतदेह सोपवण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.