श्री साईबाबा पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

संजय महाजन
शिर्डी प्रतिनिधी
मो: 8308964268

श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकान॑दजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार रोजी दुपारी एक वाजता प्रस्थान झाले श्री साईबाबा संस्थान शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ व परिसराच्या भाविक भक्तांच्या सहकार्याने साईबाबा पालखीची शिर्डी ते पंढरपूर चे आयोजन केले आहे दिंडीचे हे सतराव्या वर्ष आहे श्री ज्ञानेश्वर मंदिर निमगाव शिर्डी येथून श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशीकान॑दजी महाराज यांच्या हस्ते पूजा झाली यावेळी साईनिवाराचे मॅनेजर शिंदे साहेब ह भ प विश्राम महाराज ढमाले व मान्यवरांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात आले.

त्यानंतर श्री साईबाबा शताब्दी मंडपात साईबाबा संस्थान शिर्डी चे प्रशासकीय अधिकारी संजय जोरी साहेब व साई संस्थान पतपेढी चे सचिव श्री नबाजी डांगे. साहेब व शिर्डी ग्रामस्थांच्या हस्ते साईबाबांच्या पादुकांची पूजा करण्यात आली यावेळी बाबाजींनी दिंडीचे महत्त्व व शिस्त पालन बद्दल स्वच्छता बद्दल वारकऱ्यांना मार्गदर्शन केले सकाळ आणि दुपारी चहा नाष्टा संध्याकाळी जेवण राहण्याची व्यवस्था याबद्दल बाबाजींनी माहिती सांगितली श्री साईबाबा संस्थान शिर्डी चे प्रशासकीय अधिकारी श्री संजय जोरी साहेब यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

https://mediavartanews.com/2023/06/17/aashadhi-vari-maharashtra-information/

यावेळी श्री दत्तात्रय डांगे श्री ठकाजी काटकर श्री उत्तमराव आरंगळे तूशार चौधरी ह भ प रमेश महाराज ह भ प लहू महाराज ह भ प आदिनाथ महाराज ह भ प रेवणनाथ महाराज श्री मच्छिंद्र शिंदे श्री जालिंदर डांगे श्री संतोष मुरडणार श्री सोनाजी बनकर श्री मुंगसे गुरुजी श्री नानासाहेब काटकर श्री सुदाम झिंजुर्डे श्री साईनाथ भाबारे जालिंदर भाबारे संदीप डांगे श्री गोरख सोनवणे श्री ज्ञानेश्वर वादक यांचे योगदान लाभले व दिंडीचे प्रस्थान साई बाबा शताब्दी मंडपातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here