भिवंडीत पावसाची संततधार सुरूच, अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली
अभिजीत आर. सकपाळ, ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
मो: 9960096076
भिवंडी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजा नंतर भिवंडी शहर व ग्रामीण भागात सोमवारी सकाळी पावसाची संततधार सुरू झाली. सकाळपासूनच आकाश पावसाने भरलेले असल्याने रिमझिम तर अधून मधून जोरदार पावसाच्या सरी सुरू राहिल्याने शहरासह ग्रामीण अनेक भागात पाणी साचले होते.
विशेष म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावर तसेच राजीनोली नाका, येवई, सोनाळे या गावांच्या हद्दीत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. येथील रस्त्याचे आठ पदरीकरणाचे काम सुरू असताना काही ठिकाणी गटारी व नाळे अजूनही बनवण्यात आलेल्या नाहीत. तर अनेक ठिकाणी गटारी / नाळेसाफ व्यवस्थित रित्या न झाल्यामुले येथील रस्त्यांवर पाणी साचत असताना या पाण्यामधूनच वाहन चालकांना आपली वाहने घेऊन जावे लागत आहेत. त्यामुळे अनेक वाहन बंद सुद्धा पडत आहे.
यासोबतच शहरातील मंडई, बाजारपेठ, भाजी मार्केट, तिनबत्ती, कमला हॉटेल, अंजूरफाटा या भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील वाहतूक मंदावली होती.