मनमाड शहरातील घरफोडीचा गुन्हा नाशिक ग्रामीण पोलिसांनी केला उघड, १ किलो ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत
ज्ञानेश्वर तुपसुंदर, मनमाड: नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मूर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला हे ॲल्युमिनियमचे व्यापारी असून ते आपल्या कुटुंबासह बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून बेडरूम मधील कपाटात ठेवलेले १२०० ग्रॅम सोन्याचे दागिने व ८ लाख रुपये रोख असा मुद्द्यामाल चोरी करण्याचा गुन्हा ११ जून रोजी मनमाड पोलीस स्टेशन येथे गुरनं. 359/ 2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या धाडसी घर फोडीचा घटनेबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ दाखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले तसेच स्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ञ, तसेच फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी प्राचरण करण्यात आले. या सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पडताळणी केली असता सदरचा गुन्हा हा मनमाड शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांनीच केला असल्याचा तर्क लावून तपासाची चक्र फिरविली, ह्या गुन्ह्यात संजय गायकवाड (वय ३५) राकेश संसारे (वय ३०) राजेश शर्मा (वय ३०) अशा आरोपींना मनमाड शहर व चांदवड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी घरफोडी करुन चोरी केल्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून १ किलो ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत १ कोटी ५ लाख ४० हजारचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे.