औद्योगिक व रासायनिक प्रदूषण भविष्यातील पृथ्वीला नष्टतेची वाटचाल

115

जागतिक हवामान बदल हा निसर्गाच्या विरुद्ध मानवाने केलेला अन्याय आहे आणि त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत.

औद्योगिक प्रदूषणामुळे पृथ्वी,मानवसृष्टी,ओझेन खोरे, समुद्र,संपूर्ण प्राणीमात्र व मानव संसाधन याच्यावर आरोग्य विषयक दुष परिणाम झाले आहेत.जागतिक तापमान वाढ होऊन विपरीतकारक हवामान बदल पृथ्वीवर सतत घडून येत आहेत. पिण्याच्या स्वच्छ पाण्याचे मूळस्तोत्र कायमचे नष्टेतेकडे जात आहे.नदी नाले,सरोवरे,मृत अवस्थेकडे गेले आहेत. हवेतील मनुष्य हानिकारक रसायने सोडून त्याचे परिणामी संपूर्ण सृष्टीला भोगावे लागत आहेत. बेसुमार पाणी वापर, रासायनिक खतांपासून शेतीच्या मातीची उत्पादकता नष्ट केली आहे. बहुतेक उद्योग काही प्रमाणात प्रदूषण घडून आणतात परंतु काही उद्योग क्षेत्रे इतरांपेक्षा जास्त प्रदूषण कारक कचरा निर्माण करीत आहेत.अत्यंत विषारी रासायनिक निर्मित केली जाऊन त्यावर कुठल्याही प्रकारची बंधने घातली गेली नाहीत.

जगभरातील सर्वात व्यापक सोस्त्रपायची एक म्हणजे औद्योगिक प्रदूषण असून त्याहीपेक्षा रासायनिक प्रदूषण महा भयानक आहे.रासायनिक प्रदूषणाने पृथ्वीच्या परीघेतील नाजूक संतुलन बिघडले गेले आहे. बेसुमार खाण,शेती आणि कचरा विल्हेवाट यामुळे मातीचे मिश्रित होऊन खूप प्रदूषण झाले आहे.केडियम,पारा,सल्फराईड सीसे यासारखे वापर करून मातीची सुपीकतेला आधार देणाऱ्या सूक्ष्म जीवांची नष्टता केली आहे. ऊर्जा क्षेत्राच्या निर्मितीमुळे प्रचंड वायू प्रदूषण घडवून आणले आहे.देशात 1984 मध्ये अमेरिकेस्थित युनियन कार्बाइड इंडिया लि.कंपनीने भोपाळ येथे भीषण वायू गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडून कायमचे अपंगत्व पत्करले होते.याच कंपनीने महाराष्ट्रात देहू- भंडारदरा येथे प्रकल्प उभा करणार होते. ही अमेरिकनस्थित कंपनी सध्या डाऊ केमिकल इंडिया म्हणून आहे.अनेक आंदोलन झाल्यानंतर या कंपनीला माघार घ्यावी लागली पण भोपाळ अपघातात अनेकांना मृत्यू व दीर्घकालीन आजार याचे परिणाम भोगावे लागले आहेत.

आपल्या देशात औद्योगिकरणाचे प्रदूषण वेग फार मोठ्या प्रमाणात होत आहे.प्रगत व युरोपियन राष्ट्रांमध्ये रासायनिक कारखाने प्रामुख्याने विकसनशील देशात धाडले जाऊन गरीब राष्ट्रावर प्रदूषण व विषारी रसायने यांचे महाभयंकर परिणाम भोगावे लागत आहेत.गरीब देशात राष्ट्रीय विकासाच्या नावाखाली संपूर्ण निसर्ग, मानव,प्राणी यांचं जीवनचक्र बिघडून प्रदूषणरुपी बळी जात आहेत.त्याचबरोबर आपल्या देशातील प्राकृतिक जैविकता नष्ट तर होत आहे आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊन महाभयंकर रोगराई निर्माण होत आहे. विकासाच्या नावाखाली संकल्प आराखड्यात मायबाप सरकार मधील अधिकारी, राज्यकर्ते लाभ उठून अनेक गंभीर प्रश्न देशासमोर निर्माण करीत आहेत.याची भयानकता उग्र होऊन अनेक प्रश्न पर्यावरणाचे निर्माण झाले आहेत. मोठमोठे उद्योजक, रासायनिक कारखाने, औद्योगिक प्रदूषण, रासायनिक प्रदूषण, जल प्रदूषण व वायू प्रदूषण उथळ माथ्याने घडवून आणत आहेत. केवळ प्रदूषण कर भरून उद्योगपती नाम निराळे होत असून यावर गांभीर्याने येणाऱ्या भविष्यातील वेध कोणीच घेत नाही.पुढील येणाऱ्या वीस वर्षातील अंतरहाक आपण पृथ्वीवरील वायू,पाणी संपूर्ण जीवसृष्टीचे निर्माण धोक्यात आणली आहे. रासायनिक कारखान्यातून लाखो विषारी द्रव्ये सोडून प्राकृतिक स्वच्छ पाण्याचे प्रदूषण घडून आणत आहे. त्याचबरोबर संपूर्ण जीवसृष्टी पर्यावरणाला हानिकारक होत आहे. आणि भविष्यात जलचर जीवांचा कायमचा नायनाट करीत आहेत.त्यांच्या प्रजननावर निर्मितीवर अनेक परिणाम होत आहे. लाखो लिटर विषारी द्रव्वरूपी रसायने पृथ्वीच्या पोटात सोडून संपूर्ण सृष्टीचे जीवचक्र धोक्यात घातले आहे.सुपीक मातीमध्ये अनेक विषारीद्रव्य,धातू पदार्थ रासायनिक सोडून जमिनीची सुपीकता नष्ट करून जमिनीचे प्राकृतिक स्वरूप नष्ट होत आहे.

केंद्र सरकार राज्य सरकार सरकारी संस्थाने तज्ञ लोक केवळ कागदपत्री प्रदूषण विषय आकलन प्रोजेक्ट प्रेझेंटेशन,भाषणे व लेखन देऊन धन्यता मानत आहे.परंतु ढिसाळ राज्यकर्त्यांमुळे आपण दिवसा दिवस प्रदूषणच्या विळाख्यात वाढ करून घेत आहे.यासाठी सरकार दरबारी अत्यंत कडक कायदे करून कठोर अंमलबजावणी केली पाहिजे.त्याची पूर्णता पूर्तता करून घेतली पाहिजे.भविष्यातील हवामान बदल विषयक ग्लोबल-वार्मिंगला यशस्वीपणे मात केली पाहिजे.सृष्टी निसर्ग नाद्या-नाले ,समुद्र यांच्यावर पर्यावरणपूरक गोष्टीचा प्राकृतिक अवलंब करावा लागेल.आणि पृथ्वीच्या जैविकतेची रक्षण केले पाहिजे. पर्यावरण विषयक अंमलबजावणी मूर्त स्वरूपात होत नसते शेवटी त्याचे गंभीर परिणाम पूर्ण जीवसृष्टीला भोगावे लागत आहेत. पृथ्वीवरील हवामान बदल सतत घडून येत आहेत. आपल्या देशातील औद्योगीकरण व रासायनिक प्रदूषण हे पर्यावरणासाठी गंभीर,धोकादायक बाबी आहेत.औद्योगिक प्रदूषण हे उद्योगांमधून हानिकारण प्रदूषण उत्सर्जित वायू प्रदूषण संपूर्ण मानव कल्याण प्रणाली,प्रजाती, जीवसृष्टी प्राणीमात्रवर जीवनावर आणि दीर्घकालीन परिणामी भोगावे लागत आहेत.येणाऱ्या भविष्यकाळातील जीवनाचा ही तर धोक्याची घंटा नाही काय?

रासायनिक प्रदूषण हे कारखान्यातून द्रव्य पदार्थ, रसायने मधून करीत असताना होणारे वायू प्रदूषण व द्रव्य प्रदूषण संपूर्ण जीवसृष्टीवर अपायकारक परिणाम करीत आहे.औद्योगिक प्रक्रिया,कचरा व्यवस्थापन आणि नवीन उत्पादने घेत असताना औद्योगिक प्रदूषण वाढते.याच गोष्टी पर्यावरणाची नैसर्गिक गुणवत्ता खराब करतात दृष्टी,वास, इंद्रियांना त्रास देतात आणि आरोग्य यंत्रणेला धोका देऊन शरीराला आजारपण देतात.यामध्ये विषारी वायू प्रदूषणात कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फाडाय ऑक्साईड मुळे प्रचंड प्रदूषण होत असते. जल प्रदूषण व रासायन निर्मिती कचरा विसर्जित करत असताना होत असते.आणि याच बरोबर मातीचे प्रदूषण प्रामुख्याने जड धातू,विषारी रसायने,मिक्स होऊन पृथ्वीवर जैविकतेचे नष्ट होणारे प्रदूषण निर्माण होत आहे.यामुळे श्वसनाच्या समस्या,त्वचेचे विकार,रोग,कर्करोग असे आजार निर्माण होत आहेत.औद्योगिक रासायनिक प्रदूषणाने मानवी जीवन आरोग्यावर व जलचरांवर विपरीत परिणाम होत आहे.होणारी नव प्रजनन हे अनेक व्यंग निर्मिती होऊन परिणामी भोगावे लागत आहेत.बांधकाम व्यवसायात बेसुमार धूळ प्रदूषण,ध्वनी प्रदूषण होत आहे.कॉंक्रिटीकरणाच्या मुळे पूर्ण जैविकता सॉईल नष्ट होत आहे.आणि सिमेंट जंगले उभी राहत आहेत.औद्योगिक प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा निर्मूलन,विल्हेवाट पद्धतीचा अवलंब करावा लागेल. आधुनिक शोध व तंत्रज्ञानाचा आत्मसात केले पाहिजे.त्यामुळे उत्सर्जन होणाऱ्या प्रदूषण कमी होईल.रासायनिक प्रदूषण खते,कीटकनाशके औद्योगिकरणाचा कचरा घातक विषारी रसायने वापर यामुळे रासायनिक प्रदूषण होऊन पाणी,हवा, माती यामध्ये पसरते.होणारे दुष्परिणाम धोकादायक असून आरोग्याला पूर्ण घातक स्वरूप झाले आहे त्यामुळे प्रजनन दर विपरीत परिणाम होतात. रासायनिक प्रदूषणाने इतर परिणाम तर होतात पण पृथ्वी मातीची सुपीकता कमी करून जैविकता नष्ट होते.

वृक्ष संवर्धन ऐवजी वृक्ष नष्ट करण्यात रासायन्याचा सर्रास वापर होत आहे त्यामुळे पृथ्वी सर्व ओसाड झालीआहे.वृक्ष व वनस्पती जमिनीवरील कार्बन डाय-ऑक्साइड खेचून नष्ट करत असतात.भरपूर वृक्ष लावून जंगले निर्माण केली पाहिजेत.त्यातून कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वृक्ष कमी करत असतात.औद्योगिक व रासायनिक प्रदूषण हे राष्ट्रविकासाला हानिकारक होत आहे त्यासाठी सरकार आणि त्या क्षेत्रातील तज्ञ लोक, संशोधक,पर्यावरणवादी संरक्षक,सरकारी अधिकारी,यांना एकत्र येऊन प्रदूषण कसे कमी करता येईल याचे समांतर अवलोकन केले पाहिजे.त्यासाठी व्याख्याने,माहिती,प्रबोधन नवनवीन तंत्रांचा अवलंब केला पाहिजे.निसर्गनिर्मित संसाधनाचा वापर करून पृथ्वीवरील शेती उत्पन्नात रासायनिक वापर कमीत कमी केला पाहिजे.कुशाग्रह बुद्धी व शरीर हे राष्ट्रनिर्मितीसाठी पोषक आहे.आणि हे सर्व प्रदूषणाने मारक केले आहे. नवनवीन शोध याचा अवलंब केला पाहिजे.नाले नदी ओढे समुद्रात रासायनिक द्रव्ये व पदार्थ सोडण्यावर कडक निर्बंधाने घातली जावीत. आपल्या सभोवतालच्या पर्यावरण,निसर्ग,त्याची जैविकता,प्राकृतिकता संगोपन व संवर्धन झाले पाहिजे. आपण स्वच्छ श्वास घेत असलेली हवा, सूर्यप्रकाश आणि पृथ्वीवरील माती खनिजे यांच्यावर विपरीत परिणाम होता कामा नये. हे सर्व मानवनिर्मित प्रदूषणे त्याच्या स्वार्थी व लोभी वृत्तीने घडवून आणली आहेत.विषारी पदार्थ आणि द्रव्य कचरा याचे बेफान औद्योगीकरण जमीन व जलप्रवाहात वाढत आहे.कोळसाखाण,दगड खाणी,धातूखाणी, संगमरवरी मालबरखाणी, भूगर्भातले वायू पदार्थ खणन,यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवर प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.

रसायन उत्पादनात बहुतेक वेळा जीवांश इंधनाचा जलनाशी संबंध असतो जे वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड सारखे हरितगृह वायू उत्सर्जित करतात.हा वायू हवामान बदल वेगवेगळे घडवून सतत आणत असतो.हवामान बदलात महाकाय वादळे प्रचंड तापमान वाढ,अतिवृष्टीतून महापूर,महा दुष्काळ घडून येत असतात.वेळोवेळी भूकंप घडून येत असतात.जागतिक हवामान बदल हा निसर्गाच्या विरुद्ध मानवाने केलेला अन्याय आहे. आणि त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत.पृथ्वीवरील कार्बन डाय-ऑक्साइड हा एक चिंतेचा विषय घडून आलेला आहे.प्रचंड औद्योगिक क्रांतीतून वाहन निर्मिती होऊन महाकाय वायू प्रदूषण झाले आहे.महा काय वाहन निर्मितीतून कचऱ्या विल्हेवाट करणे फार अवघड होऊन गेले आहे. जेवढा औद्योगीकरण विकास होत आहे तेवढेच प्रदूषण वाढत आहे.

रासायनिक व औद्योगिक कचऱ्यापासून प्रदूषण चे अनेक प्रश्न दुर्गामी मानवाला भोगावे लागत आहेत.जडवस्तू स्वतःचे सेंद्रिय प्रदूषक आम्ल व धातू कचरा प्रवाह व इतर हानिकारक पदार्थ प्रदूषणाचा वेग वाढत आहे. हे सर्व हानिकारक पदार्थ नद्या सांडपाणी, पाईपलाईन व इतर मार्गाने सागरी किनारा पट्ट्यावर व सागरात प्रवेश करते.प्लॅस्टिक कचरा हे महाभयंकर शेवटी समुद्राला मिळते.मानवी आरोग्याला गंभीरदायक धोका निर्माण होऊन अन्यसाखळीतून मानव प्राणी प्रवेश करून अनेक परिणाम घडवून आणले आहेत.नवीन संशोधनात बाळ जन्माला आलेल्या नाळेमध्ये रसायनाचे घटक व प्लॅस्टिकचे तंतू सापडले असून पुढील निर्माण होणाऱ्या पिढीला आरोग्यकारक घातक असून तीव्र परिणाम भोगावे लागणार आहेत.वेळोवेळी सागरी प्रदूषणाचा परिणाम जलचर प्राणी,मासे,कासवे यावर दिसून आले आहे.आणि हे प्रचंड सागरी किनाऱ्यावर मृत अवस्थेत आढळून आले आहेत.वायु प्रदूषण,जल प्रदूषण, कचरा व ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिक प्रदूषण,माती प्रदूषण,किरणोत्स्योदित प्रदूषण,प्रकाश प्रदूषण, हवा प्रदूषण,थर्मल प्रदूषण हे थांबवण्यास पर्यावरण संस्था राष्ट्रीय मंत्रालय आणि संयुक्त पणे कडक कायदे निर्बंध केले पाहिजेत.आणि त्याची अंमलबजावणी घडवून आणली पाहिजे.तरच पृथ्वीवरील सजीवसृष्टी वाचवायची असेल तर प्राकृतिक सनसाधने, वनसंपदा,खनिजसंपदा याचे रक्षण करून औद्योगिक प्रदूषण व रासायनिक प्रदूषण यावर यशस्वी मात केली पाहिजे.तरच उद्याच्या जीवनाची पूर्तता होऊन जाईल. 

श्री तानाजी फणसे, पर्यावरण संरक्षक मो:9821454037