वर्धा आणि बुलडाण्याच्या खासदार विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल.

✒️मुकेश चौधरी✒️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
7507130263
नागपूर,दि.17 जुलै:- विदर्भातील दोन खासदारा विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंड पीठात याचिका टाकण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. त्यामुळे विदर्भात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे राजकिय आरोप प्रत्यारोपाच्या चर्चा सुरु झाल्या आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस आणि बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धनराज वंजारी, बळीराम सिरस्कर यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात त्यांनी मोठ्या प्रमाणात हेरफेर केली असल्याने त्यांना अपात्र करा, अशी विनंती त्यांनी याचिकेतून केली. याप्रकरणी 30 जुलै रोजी न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या समक्ष सुनावणी होणार असून सर्व प्रतिवादी आपापली बाजू मांडतील. निवडणूक आयोगातर्फे ॲड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली आहे.
उच्च न्यायालयात 30 जुलैला होणार सुनावणी
धनराज वंजारी, बळीराम सिरस्कर यानी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस आणि बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व लोकांचे या याचीकेकडे लक्ष लागले आहे.