अभयची क्षिक्षण क्षेत्रात यशस्वी झेप, सीए परीक्षा उत्तीर्ण

52

अभयची क्षिक्षण क्षेत्रात यशस्वी झेप, सीए परीक्षा उत्तीर्ण 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

मो: 7350050548

कारंजा: द. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने सीए या राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. अत्यंत कठीण अशी समजली जाणाऱ्या या परीक्षेमध्ये कारंजा येथील कि. न. गोयंका महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुका कार्यकारणी उपाध्यक्ष डॉ. दिनेश रघुवंशी यांचा मुलगा अभय रघुवंशी याने हीपरीक्षा उत्तीर्ण करून कारंजा शहराचे नावलौकिक केले आहे.

अभय रघुवंशी याचे शालेय शिक्षण कारंजा येथील जे. सी. हायस्कूलमध्ये झाले असून महाविद्यालयीन शिक्षण त्याने अमरावती येथील श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात पूर्ण केले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिले. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने केला सत्कार. महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे “तालुका कार्यकारणी उपाध्यक्ष प्रा. डॉ. दिनेश रघुवंशी याचे चिरजिव अभय याने मिळविले ले यश हे कारंजा नगरीच्या शैक्षणिक इतिहासात भर टाकणारे असल्याने पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडुभाऊ इंगोले यांचे नेतृत्वात तालुका कर्यकरणीचे सर्व पदाधिकारी यांनी त्याचा घरी जाऊन सत्कार केला यावेळी तालुका अध्यक्ष आरिफ भाई पोपटे उपाधक्ष प्रा. डॉ. दिनेश रघुवंशी, कोषाध्यक्ष प्रा. सी. पी. शेकुवांले तालुका संघटक आशिष धोंगळे, तालुका कार्यकारिणी सदस्य रमेश देशमुख, गालिफ पटेल, सहसचिव मोहम्मद मुन्नीवाले, दामोदर जोधलेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य कालु भाई तवांगड आदींची उपस्थिती होती.

यावेळी आरिफ पोपटे प्रा. सी. पी. शेकुवाले यांनी शाल व पुष्प गुच्छ देऊन अभय रघुवंशी याचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रमेश देशमुख यांनी तर आभार आशिष धोंगडे यांनी मानले.