बेलखेडा येथील देशी दारूच्या दुकानाचा ठराव रद्द करण्याची मागणी

76

बेलखेडा येथील देशी दारूच्या दुकानाचा ठराव रद्द करण्याची मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी 

अजय उत्तम पडघान 

7350050548

वाशीम जिल्ह्यातील बेलखेडा येथील ग्रामस्थांकडून जिल्हा प्रशासनाला लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. की बेलखेडा येथील सरपंच व तत्कालीन सचिव यांनी आमच्या गावाला लागूनच फाट्याजवळ मुमताज मुबारक मुनियार या नावाच्या एका व्यक्तीला देशी दारुच्या दुकानाचा परवाना २४, २, २०२०रोजी देण्यात आला या वेळी मात्र ग्रामसभा ऑनलाईन दाखवून सरपंच व सचिव यांनी त्या व्यक्तीशी हातमिळवणी केली कोणालाही विश्वासात न घेता सदर ठराव देण्यात आला.

देशी दारूचा ठराव नाहरकत प्रमाणात पत्र व सदर ठरावाची प्रत सरपंच व सचिव यांना माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागील करून हि माहिती मिळाली नाही त्यामुळे आम्ही उपसरपंच सदस्य व गावकरी मंडळी महिला सह ग्रामसभेची मागणी करूनही ग्रामसभा लावण्यात • येत नाही तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी बेलखेडा येथे ग्रामसभा लावण्याचा आदेश द्यावा व सर्व गावकरी मंडळी सह महिलांचे समाधान करावे तसेच देशी दारूच्या दुकानाचा ठराव ग्रामसभेतून रद्द करण्यात यावा या अगोदर सुद्धा अनेक ग्रामस्थांनी दारूबंदी विभागाला सुद्धा लेखी तक्रार दिली आहे हा देशी दारूचा परवाना रद्द न झाल्यास दारुबंदी विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे व ग्रामसभा होईपर्यंत देशी दारूच्या दुकानास परवानगी देण्यात देण्यात येवू नये १५ जुलै ते २० जुलै या कालावधीत ग्रामसभा लावण्याची आदेशित करावे असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे सदर निवेदनावर उपसरपंच उपसरपंच एस आर देव्हाडे व सदस्य यांच्यासह ४८ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.