नागपूर जिल्ह्यातील दार नसलेली १४ धरणे ओव्हर फ्लो
त्रिशा राऊत
नागपुर ग्रामीण प्रतिनिधि
मो: 9097817953
नागपूर : – पावसामुळे नवेगावखैरी, नांद,वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी,रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवतो. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यातील दारे नसलेले एकूण 14 धरणे ओव्हर फ्लो झाले आहेत. तर चार धरणाची दारे उघडण्यात आली आहे.
एकूण लहान व मोठ्या १८ धरणांतून विसर्ग सुरु आहे. या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये व गरजेनुसार सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, पाणी वाहत असताना चुकूनही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये ,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे