तळा येथे भीषण अपघातात दोघेजण गंभीर स्वरूपात जखमी
✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞
माणगांव :- तला तालुक्यातील भागवत बाग जवळ दि १६ जुलै रोजी सायंकाळी ८.३0 च्या दरम्यान मोटार सायकल व टाटा मॅजिक गाडीमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात मोटार सायकल वरील इसमाना गंभीर अशा पद्धतीने मार लागलं गेला.मॅजिक गाडी आणि मोटरसायकल या दोन गाड्यांमध्ये भीषण अपघात होऊन या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी आहेत.
काल दिनांक १६ जुलै रोजी संध्याकाळी हा अपघात भागवत बाग कडे जाणाऱ्या कॉर्नरवर घडला. भागवत बाग येथून मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या मॅजिक गाडीवर तळा येथून मांदाड कडे जाणारी मोटारसायकल प्रचंड वेगात मॅजिक गाडीवर धडकली. या अपघातात मोटारसायकलवर असलेले दोघे जण प्रचंड प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना मुंबई येथील एमजीएम आणि एका जखमीला केईएम इस्पितळात हलवण्यात आले आहे..