फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा.लि. कंपनीतर्फे आगोम विद्यामंदिर कोळथरे ला १८ सीटर स्कूलबस प्रदान!
सचिन पवार
कोकण ब्युरो चीफ
मो: 8080092301
रायगड, दि.१४जुलै: कोळथरे गावातील सुप्रसिद्ध अशा आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर शाळेला १८ सीटर नविन स्कूल बसची देणगी प्राप्त झाली आहे. पुण्यामधील फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रा.लि. या कंपनीच्या CSR उपक्रमाच्या अंतर्गत ही बस शाळेला मिळाली आहे.या शाळेच्या नावलौकिकामुळे आजूबाजूच्या गावांमधून अनेक विद्यार्थी शाळेत येत असतात. ST बसेसची अडचण , वेळांची अडचण इ. गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या या प्रवासात अनेक अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन कृष्णमामा महाजन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर दीपक महाजन यांनी अशी स्कूलबस मिळण्यासाठीची मागणी या कंपनीकडे केली होती.
या कंपनीचे जनरल मॅनेजर संदीप देवकर आणि CSR प्रमुख प्रियांका चव्हाण यांच्या विशेष सहाय्यामुळे इतकी मोठी देणगी शाळेला प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष दीपक महाजन यांनी याप्रसंगी व्यक्त केले.या स्कुलबस शालार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने बसचे जंगी स्वागत सर्व विद्यार्थी, पालक, शाळा कर्मचारी, शिक्षक वृंद, संस्थाचालक यांच्या मार्फत करण्यात आले.याप्रसंगी, मिहीर महाजन म्हणाले ही देणगी आजपर्यंतची सर्वात मोठी देणगी आर्थिकदृष्ट्या तर आहेच परंतु अधिकाधिक काम करण्यासाठी उत्साह वाढवणारी देखील आहे.सोबतच्या फोटोत नूतन स्कूलबस प्रदान करताना प्रियांका चव्हाण, संदीप देवकर, दीपक महाजन, सुबोध कोझरेकर ई.