अक्कलकुवा तालुक्यातील काठी राजवाडी येथे, संदीप पाडवी यांच्या स्वखर्चाने मिनी मशरूम युनिट तयार करण्यात आले…
प्रकाश नाईक
जिल्हा प्रतिनिधी,नंदुरबार
मो.9511655877
नंदुरबार : काल दि. 16/07/2023 रोजी राजवाडी गाव काठी ता.अक्कलकुवा जि. नंदुरबार येथे संदीप पाडवी यांचे स्वखर्चाने मिनी मशरूम युनिट तयार करण्यात आले आहे.
हे मशरूम युनिट 20 × 24 ft असे आहे . अतिशय कमी खर्चात आणि साध्या पद्धतीने तयार केलेल्या युनिटमधे सिमेंट खंबे, निलगिरीच्या दांड्या, व बांबू प्लास्टिक पाल, गोणपाट, व शेडनेट, चा वापर करून हे युनिट उभारले गेले आहे. जेणेकरून अतिशय कमी खर्चात उत्पादकाला परवडेल अश्या भांडवलीत मशरूम युनिटची उभारणी झाली आहे. ह्या युनिटची Capacity minimum 300 (बॅड) बॅगांची आहे असे युनिटचे संचालक संदीप पाडवी यांनी सांगितले. मी D.l.ed शिक्षित आहे वाढत्या लोकसंख्येला व बेरोजगारीला लक्षात घेता आजचा परिस्थितीत प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही म्हणून आजचा तरुण पिढीने व्यवसायात भर घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या परिसरात आपल्यामुळे 4 लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी मनस्थिती घेऊन 2 वर्षा पासून राजेंद्र वसावे यांचा अचूक मार्गदर्शनाखाली काम करून successfull मशरूम शेती करीत आहे.
वसावे सर यांनी डायमंड सिटी सुरत येथे तीन वर्षाचे अधिक अमेरिकेचे कॅलिफोर्निया येथे शिकवले जाणारे व्यवसायिक अध्ययन करून आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील तरुण पिढीला व्यवसाय कसा केला जातो त्याबद्दल ते असे विशेष अभ्यासक्रम ते 100% टक्के गॅरंटीने शिकवतात. भारतीय अभ्यासक्रमात व्यावसायबद्द्ल लहानपणापासून शिकवले असते तर अमेरिका जपान व इतर प्रगतशील देशासारखे आपले भारत देश देखील प्रगतिशील राष्ट्र राहिले असते. आपल्या देशात शाळा कॉलेजमध्ये व्यवसायिक प्रशिक्षणाची खूप आवश्यकता आहे.
माझे ग्रेट मेंटर राजेंद्र वसावे सर काल दि. 16/07/2023 रोजी सर्व मशरूम कंपनीचे CEO Founder व व्यावसायिक मार्गदर्शक राजेंद्रजी वसावे सर यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. या प्रसंगी राजेंद्र पाडवी(पोस्टमास्टर) शेरसिंग पाडवी, मशरूम उत्पादक भरत पावरा, तसेच विविध महिला बचत गटाचे सदस्यांनी ह्या कार्यक्रमात उपस्थिती दिली होती.