उत्तर आणि वायव्य भारतात पावसाचा कहर सुरूच

रमेश लांजेवार

मो: 9921690779

सध्याच्या परिस्थितीत देशातील उत्तर आणि वायव्य भागातील अती पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे भुस्खलन व नद्यांच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जिवित हाणी सुध्दा झाली आहे.त्याचप्रमाणे शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे सुध्दा मोठे नुकसान झाले आहे.पावसाळ्याची गंभीर परिस्थिती पहाता सर्वांनी स्वतःला सांभाळने गरजेचे आहे. यावर्षी पाऊस उशिरा आला. परंतु देशातील काही भागात पावसाने उग्र रूप धारण केल्याने देशातील अनेक भागात पुर परिस्थीती निर्माण होवून अनेक भाग जलमग्न झाल्याचे दिसून येते.

सध्याच्या परिस्थितीत दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिशा,झारखंड, बिहार, सौराष्ट्र व कच्छ, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड,हिमाचल प्रदेश सह अनेक भागात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने पावसाने विक्राळ रूप धारण केले आहे.यामुळे जिकडे पहाल तिकडे आपल्याला पाणीच पाणी दिसते.काही भागात ढग फुटी सुध्दा झाली आहे.यामुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात मानवी व पशुपक्षांची जीवित हाणी सुध्दा झाली आहे.देशात अनेक नद्यांना महापुर आलेला असुन संपूर्ण नद्या तुडुंब भरून धोकादायक स्थितीमध्ये आहेत.यामुळे अनेक धरण भरल्याने प्रत्येक धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.त्यामुळे भारतात आपल्याला पुराने थैमान निर्माण झाल्याचे दिसून येते. देशात अनेक भागांमध्ये पुरांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे दिसून येते.हिमाचल प्रदेशात तर पावसाने भयानक धुमाकूळ घातला आहे.

हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.भूस्खलन, रस्त्यांना खड्डे, पूरस्थितीमुळे रस्त्यासह पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे अती पावसामुळे ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुर्घटनांचे प्रमाणात प्रमाणात वाढले आहे जनुकाय अती पाऊस “मौत का कुवॉ” बनल्याचे दिसून येते.हा सर्वप्रकार निसर्गाचा ह्यास होत असल्याने निर्माण झालेला आहे.त्यामुळे जीवीत हानी सुध्दा होत आहे.पावसाचे विक्राळ रूप पहाता व यामुळे निर्माण होणारी पुरपरीस्थीती, रस्त्यांना पडलेले खड्डे यामुळे होणाऱ्या दुर्घटना यापासून सर्वांनीच सतर्क राहाने गरजेचे आहे.त्यामुळे जनतेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नदी-नाल्याचा पुर, रोडचे खड्डे यापासून सावध रहावे जेनेकरून आपल्याला जिवीत हानी टाळता येईल.कारण “जान है तो जहान है”हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.आपण निसर्गाच्या महाप्रलयाला रोखु शकत नाही.परंतु सावधगिरी अवश्य बाळगू शकतो

त्यामुळे या कठीण घडीला प्रत्येकांनी आपापल्या परीने सावधगिरी बाळगली पाहिजे.कारण आपल्या पुर्वजांनी सांगितले आहे की “आगीशी व पाण्याशी खेळु नये”.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पावसाच्या पाण्यापासुन सावधान रहाने अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नदी-नाल्याच्या पुरातुन जावु नये किंवा प्रवास करू नये व स्वतःचा जीव धोक्यात टाकू नये.आज देशातील अनेक क्षेत्रातील घरे व शेती पाण्याखाली आलेली आहेत त्यामुळे गंभीर परिस्थिती आहे. सध्याच्या परिस्थितीत पावसाच्या पाण्याने विक्राळ रूप धारण केल्याने  पशुपक्षी व मानवजातीसाठी काळ बनल्याचे दिसून येते.त्यामुळे सर्वांनीच नदी-नाल्याच्या पुरांपासुन  सावधान राहुन आपले कार्य  करावे व “जान है तो जहान है” हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारावा.कारण देशातील पुरपरिस्थितीवर सरकारी यंत्रणा आपली चोख भुमिका बजावीत आहे.अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणेला सर्वांनीच मदत करेन गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here