शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख केदारी यांची संजय राऊत यांच्या सोबत भेट व चर्चा!

15

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख केदारी यांची संजय राऊत यांच्या सोबत भेट व चर्चा! संघटनात्मक हालचालीना वेग

मारोती काबंऴे

गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

मो: 9405720593

गडचिरोली: -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी यांनी नुकतेच शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे मुलुख मैदानी तोफ, खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विकासात्मक व पक्ष संघटने संदर्भात सविस्तर चर्चा केले. यावेळी त्यांच्या समवेत अहेरी विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी पाटील होते.

     गडचिरोली जिल्हा मागासला असून जिल्हा उद्योग विरहित आहे, जिल्ह्यात पक्षाचा आमदार, खासदार नसून पक्षाचे पाळेमुळे व विस्तार अधिक जोमाने करण्यासाठी व पक्ष वाढीसाठी शिवसेना पक्ष गडचिरोली जिल्ह्यात विशेष लक्ष घालणे अत्यावश्यक असल्याचे संपर्क प्रमुख महेश केदारी यांनी खा.संजय राऊत यांचे लक्ष वेधले.

    खा.संजय राऊत यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी व पक्षाचे ध्येय-धोरणे उत्तमरित्या राबविन्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन सकारात्मक पाऊल उचलन्याचे संकेत दिले.

    शिवसेना पक्षाचे नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून लेखाजोखा व व्यथा पक्षाच्या वरिष्टाकड़े मांडत असल्याने नक्कीच येथील प्रश्न मार्गी लागतील व केदारी यांचे खा. संजय राऊत यांच्या भेटीचे समाधान व आनंद शिवसेना पक्षाचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी व्यक्त करुण अजुन पक्षाच्या संघटनात्मक हालचालीना नवी गती मिळणार असल्याचे म्हटले.