खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महावितरणच्या कंत्राटी कामगारांना रेनकोट वाटप

खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महावितरणच्या कंत्राटी कामगारांना रेनकोट वाटप

सिद्धेश पवार
तालुका प्रतिनिधी पोलादपूर
8482851532

पोलादपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार आदरणीय श्री. सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महावितरण कंपनीतील आऊटसोर्सिंग कंत्राटी कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पावसाळ्यात कष्ट करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळाला आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. विटोबा पार्टे, शहर अध्यक्ष श्री. अजित खेडेकर, माजी सभापती श्री. दिलीप भागवत, नगरसेवक श्री. स्वप्नील भुवड, श्री. अजय सलागरे, श्री. नितीन शेठ, श्री. सचिन गायकवाड, श्री. नितीन आरडे, श्री. सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

कामगारांनी यावेळी आपली भावना व्यक्त करत सांगितले की, “आम्ही अनेक वर्षांपासून कोणतीही मदत न मिळवता ऊन, पाऊस न पाहता अहोरात्र मेहनत करत आहोत. मात्र आज आदरणीय खासदार श्री. सुनील तटकरे साहेबांनी आमच्या कामाची दखल घेतली आणि आमच्यासाठी उपयुक्त ठरणारे रेनकोट दिले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.”

या उपक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामगारांविषयी असणारे आपुलकी यातून दिसत आहे